एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, आबलोली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले गुरुजनांबद्दल कृतज्ञता, शिक्षकांकडून मिळाले मोलाचे मार्गदर्शन
आबलोली (संदेश कदम) – गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, आबलोली येथे यंदाची गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली, तर शिक्षकांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता १० वी मधील शर्वरी पवार, फरिना कुरेशी, श्रावणी वाघे, आयुष दाते, पियुष रहाटे, कार्तिक मोहित, प्रणव कांबळे, तसेच इयत्ता ९ वीचे विद्यार्थी तनिश पटेल, साईराज साळवी, सार्थक शिगवण यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपली मनोगते व्यक्त केली. याशिवाय, इयत्ता ४ थीची आराध्या गौरविले आणि इयत्ता तिसरीचे विद्यार्थी हर्षिता रहाटे, शौर्य राठोड, देवांश किर्वे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. इयत्ता ३ री ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुचे महत्त्व सांगणारे गीत अत्यंत सुमधुर आवाजात सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, तसेच सहशिक्षक सौ. शर्मिष्ठा साळुंखे, सौ. शमीम मुल्ला, श्री. तेजस केंबळे, श्री. दामोदर गोणबरे यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका सौ. शिगवण प्रांजली, सौ. शीतल सोनवलकर, अंटी धुमाळे यांचीही उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मीनाक्षी सुंदाशा हिने अत्यंत उत्कृष्टपणे केले.
#GuruPurnima #ExcellentAcademyAbololi #शिक्षण #गुरुपौर्णिमा२०२५ #मराठीबातमी #शिक्षक #विद्यार्थी #आबलोली #Guhagar #Education #SchoolEvent #गु
रुवंदन















