:यवतमाळ: उप अभियंता लाच घेताना रंगेहाथ अडकला, स्मशानभूमीच्या कामाचे देयक काढण्यासाठी मागितले २० हजार रुपये
💰 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आर्णी येथे कारवाई; खाजगी चालकासह अटक
यवतमाळ~ जिल्ह्यातील आर्णी येथे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामाचे देयक काढून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील उप अभियंता संतोष भगवानराव क्षिरसागर (वय ५३) यांना खाजगी चालकासह रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी, १६ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केली
तक्रारदार सरपंचाने त्यांच्या गावात स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे एकूण १० लाख रुपये मंजूर झाले होते, परंतु देयकासाठी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी गेलेल्या सरपंचाकडे उप अभियंत्याने २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली, आणि दुसऱ्या दिवशी पडताळणी दरम्यान उप अभियंत्याने तडजोडीने १० हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली.
१६ जुलै रोजी दुपारी सापळा रचून, आर्णी येथील शासकीय कार्यालयात उप अभियंता क्षिरसागर यांनी त्यांचा खाजगी चालक सागर शंकरराव भारती (वय २७) याच्या मार्फत लाच स्वीकारली. त्यावेळी दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज ओरके (ACB, यवतमाळ) करत आहेत.
—
✅
यवतमाळ लाचखोरी, आर्णी उप अभियंता लाच, स्मशानभूमी काम भ्रष्टाचार, ACB यवतमाळ कारवाई, Santosh Kshirsagar Bribe