■ होळी न.पा. पु. योजना खर्चाच्या अपव्यय बाबत अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर
■ तब्बल २० लक्ष ५५ हजार खर्च झाल्याचा अहवाल
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- ( होळी) :- ग्रामपंचायत दळे महसूल गाव होळी मधील पाण्याचा प्रश्न न्यायालयीन दरबारी असतानाच, होळी मधील त्याच विहिरीवरील लोकांना पाणी मिळण्यासाठी शासनाचे लाखो-करोडो रुपये खर्च केलेला आज मात्र पाण्यात गेलेल्या आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही. सरकार मात्र पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत असतो,तर दुसरीकडे मात्र काही टक्केवारी साठी आणि संपूर्ण मलिदा खाण्यासाठी जणू जाही याच पाण्यात हात धुऊन घेताना ठेकेदार, सरपंच, आणि पाणी पुरवठा अधिकारी दिसत आहे,याचे प्रत्येय होळी नळ पाणी सडेवाडी योजन मध्ये आलेले दिसतो.अश्या आशयाचे बातमी काही दिवसांपूर्वी दैनिक चालु वार्ता ने दिली होति,त्यावर त्वरित मा. उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी कारवाई करुन गटविकास अधिकारी यांच्याकडे पुढिल कारवाई साठी दिली देऊन लवकरात लवकर याची माहीती घेउन योग्य ती कारवाई करावी अश्या आदेश दिले होते.
सदर,विषयी गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी १४ मे २५ रोजी ग्रामिण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उप विभाग याना पत्र देऊन खर्च बाबत विचारणा केली होती, त्यावर पाणीपुरवठा विभाग उप अभियंता प्रशांत पावर यांनी दि.१६ मे २५ रोजी पत्र देऊन संपूर्ण खर्च बाबत अहवाल दिला आहे.यात होळी सडे वाडी नळ पाणी पुरवठा करणे,राष्टीय पेयजल कार्यक्रम सन २०११-१२ खर्च १२,७० हजार, १४ वा वीत्त आयोग मार्फत २ लक्ष १० हजार इतकी रक्कम विनावापर विहिरीला झाला,त्याचप्रमाणे याच विनावापर विहीरी साठी जलयुक्त शिवार योजना सन १०१८-१९ मधून संरक्षण भिंत रक्कम ४ लाख ७६ हजार ,पून्हा याच साठी १५ वित्त आयोग माध्यमातून १ लक्ष असे एकूण या विनावापर विहिरीसाठी २० लाख ५५ हजार खर्च झालेचा अहवाल पाणीपुरवठा विभाग ने गटविकास अधिकारी यांना दिला आहे.
सदर, अहवाल दि.१६ मे २५ दिला असून या आधीचे गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई किव्हा वारीष्ठना पत्रव्यवहार केला नाही,परंतु गटविकास अधिकारी जाधव यांनी याबाबत चौकशी करून १६ जुलै २५ रोजी उपविभागीय अधिकारी राजापूर यांना पुढील कारवाई साठी पत्र दिले आहे.यावर उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे.