धक्कादायक! बारामतीत बँक मॅनेजरची आत्महत्या, ‘अतिरिक्त कामाचा दबाव’ असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धक्कादायक! बारामतीत बँक मॅनेजरची आत्महत्या, ‘अतिरिक्त कामाचा दबाव’ असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद

बारामती, पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती येथे एका बँक व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिगवण रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्र यांनी गुरुवारी रात्री उशिरा बँकेतच गळफास घेऊन आयुष्य संपवले. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मित्र हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील होते आणि अनेक वर्षांपासून बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते वरिष्ठांच्या वाढत्या कामाच्या दबावामुळे तणावात होते, अशी चर्चा आहे. यासंदर्भात त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

पाच-सहा दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मित्र यांना ही नोकरी सोडायची होती आणि त्यांनी अनेकदा वरिष्ठांना अतिरिक्त दबाव न टाकण्याची विनंती केली होती, परंतु त्यांची कोणीही ऐकले नाही असे सांगितले जात आहे. याच निराशेपोटी त्यांनी काल रात्री उशिरा सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.

सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासा:

शिवशंकर मित्र यांनी आपल्या शेवटच्या चिठ्ठीत बँकेला विनंती केली आहे की, “आपल्या मृत्यूनंतर बँकेने आपली इच्छा पूर्ण करावी व कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त दबाव टाकू नये. प्रत्येक कर्मचारी आपल्या परीने शंभर टक्के योगदान देत असतो. त्यामुळे बँकेने अशा प्रकारचा कोणताही दबाव टाकू नये. मी माझी आत्महत्या पूर्ण इच्छेने व जबाबदारीने करत आहे. याला माझ्या कुटुंबाला जबाबदार धरू नये. केवळ आणि केवळ बँकेच्या अतिरिक्त दबावामुळेच मी आत्महत्या करत आहे.”

याशिवाय, त्यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे, ज्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले. बारामतीतील बँकेच्या शाखेतच आत्महत्येचा असा हा पहिलाच प्रकार असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील कामाच्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

#Baramati #BankManagerSuicide #ShivshankarMitra #BankOfBaroda #WorkPressure #SuicideNote #PuneNews #BankingSector #EmotionalStress #Atmadhatya #ExtraWorkPressure

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण आबलोली (संदेश कदम)  कोकणातलं पर्यटन अनेकांना आवडतं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हेच...
Read More
बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश वैभववाडी तालुक्यात राजकीय भूकंप: जिल्हा परिषद उमेदवार आणि...
Read More
सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १६व्या सामन्यात राजस्थान...
Read More
सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

  *शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात* *रत्नागिरी:- निलेश रहाटे जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक...
Read More
शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील...
Read More
गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १४व्या सामन्यात...
Read More
बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा   रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस...
Read More
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा