कोतळूकच्या सुपुत्राचा BSF मध्ये डंका! संकेत गोताड याचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 कोतळूकच्या सुपुत्राचा BSF मध्ये डंका! संकेत गोताड याचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं फळ: अबलोलीत आनंदोत्सव

आबलोली (संदेश कदम)

आजच्या तरुण पिढीला आदर्श ठरेल अशा जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर, अपयश पदरी आलं तरी हार न मानता गुहागर तालुक्यातील कोतळूक गावचा सुपुत्र संकेत शंकर गोताड याची BSF (Border Security Force) मध्ये निवड झाली आहे. सध्या तो राजस्थानमधील जोधपूर येथे कार्यरत असून, त्याच्या या यशाबद्दल कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” आणि “वंदेमातरम्” च्या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.

कोतळूक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या या विशेष सत्कार समारंभात संकेत गोताडला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संकेतने आपले चौथीपर्यंतचे शिक्षण कोतळूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यानंतर आबलोली येथील हायस्कूलमधून त्याने दहावी पूर्ण केली आणि बारावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. वेळणेश्वर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच, सैन्य दलात भरती होण्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी त्याने सांगली येथील एका अकॅडमीत प्रवेश घेतला.

संकेतने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने अथक प्रयत्न सुरू ठेवले. तीन वर्षांपूर्वी त्याला सैन्य दलात भरती होण्याची संधी मिळाली होती, परंतु दुर्दैवाने त्यावेळी त्याला अपयश आले. तरीही तो खचून न जाता, मेहनत आणि जिद्द कायम ठेवून आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर त्याच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि त्याची BSF मध्ये निवड झाली. सध्या तो राजस्थानमधील जोधपूर येथे रुजू झाला आहे.

सैन्य दलात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच तो कोतळूक गावात परतल्याने, त्याच्या सत्काराचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याचे आई-वडील, सरपंच सौ. प्रगती मोहिते, उपसरपंच शितल गोरिवले, सदस्य सचिन ओक, सचिन भेकरे, सुनील आगिवले, लक्ष्मण वरकर, समीक्षा वाघे, आसावरी बाधावटे, मनाली मोहिते, ग्रामपंचायत अधिकारी कमलाकर शिरकर, कोतळूक सोसायटीचे चेअरमन पांडुरंग कावणकर, पोलीस पाटील संचिता मोहिते, विनोद शिगवण, शमिका भेकरे, कोतळूक शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक प्रताप देसले, वसंत गोरिवले, समीर ओक, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर, कोतळूक शाळा क्र. १ चे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

#संकेतगोताड #कोतळूक #BSF #BorderSecurityForce #ग्रामपंचायत #सत्कार #अबलोली #गुहागर #महाराष्ट्रपोलीस #सैन्यदलातभरती #यशोकथा #प्रेरणास्थान #तरुणभारत #जिद्द #चिकाटी #मेहनत #जयहिंद #राजस्थान

#जोधपूर

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...