सौ.साक्षी पराडकर लांजा तालुक्यातील माहिती अधिकार फेडरेशनच्या महिला अध्यक्षपदी नियुक्त
लांजा ( जितेंद्र चव्हाण प्रतिनिधी): माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या लांजा तालुक्याच्या महिला विभागाच्या अध्यक्षपदी साक्षी संतोष पराडकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची शिफारस तालुका उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी केली असून जिल्हा सचिव पद्मनाथ कोठारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
सदर नियुक्ती पत्र हे मानद स्वरूपाचे असून, त्यामध्ये भारतीय संविधान, भारतीय कायदे आणि माहिती अधिकार फेडरेशनच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती अधिकार अधिनियम 2005 चा जनहितासाठी प्रभावी वापर करणे, तसेच सामान्य जनतेमध्ये या कायद्याचा प्रचार व प्रसार करणे याचेही निर्देश आहेत.
सामाजिक कार्यात सतत सक्रिय असणाऱ्या साक्षी पराडकर यांची निवड ही त्यांच्या कार्याची दखल घेत करण्यात आली आहे. कालच त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.
तालुक्यात फेडरेशनच्या महिला संघटनेला अधिक बळकटी देण्याचा उद्देश असल्याचे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. “आपल्याला लांजा तालुक्यात माहिती अधिकार फेडरेशन अधिक मजबूत करायचं आहे,” असे ते म्हणाले.
—
🔖 #SakshiParadkar #MahitiAdhikar #LanjaTaluka #RTIFederation #WomenLeadership #SocialWork #माहिती_अधिकार #लांजा #सक्षमीकरण #महिला_अध्यक्ष #रत्नागिरी
—
📸 फोटो
—