🛑 वांद्रे स्थानकावरील अवैध वाहतूक थांबणार?
आमदार वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले विशेष मोहिमेचे आदेश
मुंबई | प्रतिनिधी
वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारकांच्या मनमानी कारभाराविरोधात आता कडक पावले उचलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार वरुण सरदेसाई यांनी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत अवैध वाहतूक, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, जवळच्या अंतरासाठी प्रवासास नकार देणे, आणि प्रवाशांशी हुज्जत घालणे अशा तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही फारसा परिणाम न झाल्याने आमदार सरदेसाई यांनी थेट मंत्री सरनाईक यांच्याकडे हे प्रकरण नेले.
गेल्या अधिवेशनातही अशाच स्वरूपाची बैठक घेण्यात आली होती आणि परिवहन विभागाने एक तक्रार निवारण WhatsApp क्रमांक जाहीर केला होता. मात्र त्या क्रमांकाची पुरेशी प्रसिद्धी करण्यात आली नव्हती.
त्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईक यांनी येत्या सोमवारपासून वांद्रे स्थानक परिसरात विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रार निवारण क्रमांकाची प्रभावी जनजागृती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
—
🔖 #BandraStation #IllegalTransport #VarunSardesai #PratapSarnaik #RikshawTaxiIssue #MumbaiNews #परिवहनमंत्री #अवैधवाहतूक #मुंबईबातमी #सार्वजनिकवाहतूक #TaxisInMumbai #VarunSardesaiUpdates #RTOAction
—
📸 फोटो
—