शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): वसई उपतालुका प्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक नरेश (काका) वैद्य यांची नियुक्ती
: वसईच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण; पक्ष नेतृत्वाने दाखवला विश्वास
विरार – संदीप शेमणकर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, ज्येष्ठ आणि कडवट शिवसैनिक नरेश (काका) वैद्य यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वसई उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर लोकसभा संघटक जनार्दन (मामा) पाटील आणि जिल्हाप्रमुख प्रवीण म्हापरळकर यांच्या सूचनेनुसार ही महत्त्वपूर्ण जबाबदारी नरेश वैद्य यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे वसई तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. विविध प्रभागांमधील पदाधिकारी आणि शिवसैनिक नरेश (काका) वैद्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, पक्ष संघटनेला वसईत अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Hashtags
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #NareshKakaVaidya #VasaiShivsena #PalgharPolitics #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsainik #VasaiNews #महाराष्ट्राचीराजकारण #ठाकरेसरकार