जैतापुरमध्ये भव्य आमदार चषक कॅरम स्पर्धा; २६-२७ जुलै रोजी होणार रत्नागिरी जिल्हा मानांकन स्पर्धा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जैतापुरमध्ये भव्य आमदार चषक कॅरम स्पर्धा; २६-२७ जुलै रोजी होणार रत्नागिरी जिल्हा मानांकन स्पर्धा

✍️राजू सागवेकर /राजापूर 

राजापूर तालुक्यातील जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आणि आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत यांच्या सन्मानार्थ आमदार चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ व २७ जुलै २०२५ रोजी काझी मल्टीपर्पज हॉल, होली, जैतापूर, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हास्तरावर खेळवली जाणारी ही दुसरी मानांकन स्पर्धा असून, स्पर्धेत खालील सात गटांत सामने खेळवले जाणार आहेत:

१. पुरुष एकेरी

२. पुरुष दुहेरी

३. महिला एकेरी

४. कुमार गट

५. कुमारी गट

६. किशोर गट

७. किशोरी गट

प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांची नोंदणी आवश्यक असून, अन्यथा संबंधित गटाची स्पर्धा रद्द करण्यात येईल.

नोंदणी व प्रवेश फी:

जिल्हा रजिस्ट्रेशन फी: ₹५०/-

पुरुष व महिला एकेरी: ₹१५०/-

दुहेरी: ₹२००/-

लहान गट (कुमार/कुमारी/किशोर/किशोरी): ₹१००/-

सर्व स्पर्धकांनी आपली नोंदणी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे शुल्कासह करणे आवश्यक आहे. खेळात सहभागी होण्यासाठी पांढऱ्या रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे बंधनकारक असून, कोणतीही तक्रार स्वीकृत केली जाणार नाही.

नविन नियमांतर्गत: पुरुष दुहेरीचे सामने चार बोर्डावर तीन सेट पद्धतीने खेळवले जाणार आहेत.

*तालुका प्रतिनिधींची यादी:*

१ ) गुहागर – श्री प्रदीप परचुरे ( ९४२३०४८२५०)

२ ) रत्नागिरी – श्री विनायक जोशी ( ८३९०३८७४८३)

३ ) देवरूख – श्री राहुल भस्मे (९६५७६३७६७८), श्री मोहन हजारे ( ९४२२०५३९४३)

४ ) चिपळूण – श्री प्रकाश कानिटकर ( ९४०३५६४७८२), श्री दीपक वाटेकर (९९७५५४६६२५)

५ ) संगमेश्वर – श्री मनमोहन बेंडके ( ९१३०३०६५२५)

६ ) लांजा – श्री मनोज जाधव ( ७६२०११६७३६)

७ ) खेड – श्री योगेश आपटे ( ९९५३२२२६३१)

८ ) राजापूर – श्री मनोज सप्रे ( ९४०३७६८३७६)

९) दापोली – श्री माधव शेट्ये (९२०९७०९७९२)

*प्रमुख पंच:*

राष्ट्रीय पंच: श्री साई प्रकाश कानीटकर

राज्यस्तरीय पंच: श्री सागर कुलकर्णी

स्पर्धा प्रमुख: श्री एकनाथ पाटील

या स्पर्धेचे आयोजन जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी आणि सल्लागार मंडळींनी देखील स्पर्धेस भरघोस पाठिंबा दिला आहे.

अधिक माहिती व नोंदणीसाठी सर्व स्पर्धकांनी आपल्या तालुका प्रतिनिधींशी तातडीने संपर्क साधावा.

ही स्पर्धा खेळाडूंना जिल्हा स्तरावर स्वतःचे स्थान सिद्ध करण्याची मोठी संधी देणार आहे. सर्व कॅरमप्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज
Play sound