शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवलीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सांगलीत उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवलीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सांगलीत उत्साहात संपन्न

आमदार शेखर निकम आणि आमदार रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती; महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आणि भावी योजनांवर चर्चाशरद चंद्र

सांगली (संदेश कदम, आबलोली): चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील सांगली आणि कोल्हापूर भागातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम, तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्री ॲग्री ॲल्युम्नी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व माजी विद्यार्थ्यांना संघटित करणे आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध कायम ठेवणे हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुमारे २०० माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी विविध आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आणि भविष्यात महाविद्यालयामध्ये सुधारित असे कृषी ए-आय सेंटर (Agricultural AI Centre) स्थापन करण्याचे आश्वासनही दिले.

आमदार रोहित पाटील यांनीही या कार्यक्रमाला संबोधित करत स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि आमदार शेखर निकम यांच्यातील घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आठवणींना उजाळा दिला. त्यांनी शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय हे अद्ययावत व सुसज्ज सुविधांनी परिपूर्ण असलेले महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय असल्याचे गौरवोद्गार काढले आणि आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने संवाद साधत मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवनानंतर विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत गाठलेली यशाची उंची पाहून ते भावुक झाले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुमारे पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे साक्षीदार होता आले, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता आले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अनिरुद्ध निकम यांनीदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार शेखर निकम, आमदार रोहित पाटील, प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील आणि अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर आणि पालकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हरिश्चंद्र भागडे, श्री. विपुल घाग, प्रा. प्रसाद साळुंके, श्री. सुनील निकम आणि श्री. गोकुळ पिरधनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

#SharadchandraPawarAgricultureCollege #KharvateDahivali #AlumniMeet #Sangli #Kolhapur #MLAShekharNikam #MLARohitPatil #AgricultureEducation #RuralDevelopment #कृषीमहाविद्यालय #माजीविद्यार्थीमेळावा #सांगली #चिपळूण #शरदचंद्रपवार #कृषीशिक्षण #शेती

#शिक्षण

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...