वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात व वरिष्ठ हयांच्या पत्राची दखल न घेतल्या बाबत लाक्षणिक उपोषण
वाटद (ता. रत्नागिरी) | प्रतिनिधी. निलेश रहाटे
ग्रामपंचायत वाटद मिरवणे येथे प्रशासनाच्या बेपर्वा, बेजबाबदार व अपारदर्शक कारभाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार श्री निलेश रहाटे आणि जागरूक ग्रामस्थांच्या वतीने ३१ जुलै २०२५ रोजी लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपोषण सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू होणार असून श्री. निलेश रहाटे यांच्या नेतृत्वाखाली हा लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्याचा प्रयत्न आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासन निर्णय, परिपत्रके व लेखी तक्रारी ग्रामपंचायतीकडे पाठवूनही प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश, लोकशाही मूल्ये आणि पारदर्शक कारभाराच्या मागण्या धाब्यावर बसविल्या जात असल्याने, ही टोकाची भूमिका घेण्यात आली आहे.
*उपोषणामध्ये मांडले जाणारे मुख्य १६ मागण्या:*
1. बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी
2. हालचाल नोंदणी व तक्रार नोंद वहीची उपलब्धता
3. ओळखपत्र व गणवेश बंधनकारक करणे
4. कार्यालयीन व्यसनांवर बंदी
5. दर सोमवारी माहिती अवलोकन साठी नागरिकांना द्यावी, तसा फलक लावावा
6. CCTV मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा द्यावी
7. शासन योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवाव्यात
8. शिबिरांचे खर्च ग्रामनिधीतून करावेत
9. शेतकरी लाभ योजनांची त्वरित अंमलबजावणी
10. ग्रामसभेत ठरावावर ग्रामस्थांच्या सह्या आवश्यक
11. विकासकामांची गुणवत्ता तपासून योग्य कारवाई करावी
12. ग्रामसभा पूर्वी वार्डसभा घेणे बंधनकारक करावे
13. ग्रामस्तरीय अधिकारी उपस्थित राहून आढावा द्यावा
14. ग्रामसभेची माहिती दवंडी, नोटीस, एसएमएसद्वारे द्यावी व चित्रफीत तयार करावी
15. महा-ई-सेवा केंद्रांनी सर्व व्यवहार ऑनलाइन करावेत
16. ‘मेरी पंचायत’ पोर्टलवर नियमित अद्ययावत माहिती अपलोड करणे
📣 आयोजकांचे मत:
“ग्रामपंचायतीच्या अपारदर्शक कारभारामुळे ग्रामस्थांचा विश्वास ढळला आहे. माहिती अधिकार, शासन परिपत्रक आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हा लढा सुरू आहे.” – निलेश रहाटे