कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर ग्रामीण आणि कुणबी पतसंस्थे तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन मधील लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब सभागृहात कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि पतसंस्थेच्या गुणवंत पाल्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा समाज शाखेचे सल्लागार व पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या व शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर समाज शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते यांनी प्रास्ताविक केले
त्यानंतर भारत सरकार मुंबई सीमा शुल्क कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर सर यांनी विद्यार्थी व पालक यांना मौलिक मार्गदर्शन केले त्यानंतर इयत्ता दहावी, बारावी व उच्चशिक्षित तसेच विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन केलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा व पतसंस्थेच्या पाल्यांच्या 250 विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले.त्यानंतर माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, समाजशाखेचे मुंबईचे अध्यक्ष अनंत मालप, समाजशाखेचे सल्लागार व कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र गुरुजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले
यावेळी विचार पिठावर अध्यक्षस्थानी रामचंद्र हुमणे गुरुजी, भारत सरकार मुंबई कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर सर, मुंबई समाज शाखेचे अध्यक्ष अनंत मालप, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, समाज शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते, रामाणे गुरुजी, भालचंद्र जोगळे, रामचंद्र आडविलकर, शंकर मोरे, शंकर ठोंबरे, श्रीमती. वनिता डिंगणकर,सौ. श्रावणी पागडे, माजी सभापती विलास वाघे, आशिष घाणेकर, महादेव वणे, अनंत पागडे, अनिल घाणेकर, विजय पागडे, अमोल वाघे, वैभव आदवडे, उदय गोरीवले यांचे सह समाज शाखेचे पदाधिकारी व पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते. विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज शाखेचे सरचिटणीस प्रदीप बेंडल यांनी केले तर समाज शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते यांनी सर्वांचे आभार मानले.