उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार” मिळाल्या बद्दल गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव
आबलोली (संदेश कदम)
आपत्ती काळात गुहागर तालुक्यात उत्कृष्ट नियोजन करून गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना महसूल दिनात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचेहस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल गुहागर तालुक्यातील सुयश कॉम्पुटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी, काजुर्ली येथील उद्योजक अनंत शांताराम साळवी उर्फ बावा साळवी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्यावर गुहागर तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे















