🔎 लांज्यातील चोरीचा उलगडा! आरोपीला अटक, मुंबईतून सोन्याचा मुद्देमाल जप्त.
लांजा पोलीसांचा पराक्रम – 37.900 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
लांजा ( जितेंद्र चव्हाण,रत्नागिरी) : लांजा पोलीस ठाण्यात 31 जुलै 2025 रोजी दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी ऋषिकेश अंकुश पराडकर (रा. रूण पराडकरवाडी, ता. लांजा) याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत आरोपीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर तपास पथकाने मुंबई सांताक्रूझ येथे धडक मारत चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
मा. पोलीस अधीक्षक सो रत्नागिरी आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको नासिर नावळेकर, पोहेको विलास जाधव आणि पोको नितेश आर्डे यांनी तपास पथक तयार करून 7 ऑगस्ट रोजी मुंबई सांताक्रूझ येथे छापा टाकला. आरोपीकडून 5.300 ग्रॅम आणि 32.600 ग्रॅम अशा एकूण 37.900 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
8 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीला मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
👉लांजा येथील चोरीची बातमी आम्ही या प्रसिद्ध केली होती ⭕ वाचा क्लिक करा.👈
#लांजा_चोरी #रत्नागिरी_पोलीस #MumbaiSantacruz #CrimeNews #PoliceAction #SonyaChiChori #RatnagiriNews #LanjaPolice















