📚 CBSE नववीची परीक्षा ‘ओपन बुक’ पद्धतीने; दहावी-बारावींसाठी डिजिटल मूल्यांकनाचा निर्णय
NEP 2020 च्या दिशेने मोठी पावले; विद्यार्थ्यांच्या समजुतीवर भर
नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 2026-27 शैक्षणिक वर्षापासून नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ओपन बुक मूल्यांकन पद्धतीने घेण्यात येणार आहे, तर दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांचे डिजिटल मूल्यांकन करण्यात येणार आहे.
📌 नववीसाठी ओपन बुक मूल्यांकन
CBSE च्या निर्णयानुसार गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पुस्तकांचा संदर्भ घेण्याची मुभा असेल. ही पद्धत राष्ट्रीय शिक्षण नीती (NEP 2020) च्या आधारावर लागू केली जात आहे. उद्देश हा केवळ पाठांतर न करता विद्यार्थ्यांचा विषयावरील सखोल आकलन तपासणे हा आहे. शिक्षकांनीही या बदलाला समर्थन दिले आहे.
📌 दहावी-बारावीचे डिजिटल मूल्यांकन
अलीकडे पार पडलेल्या CBSE गव्हर्निंग बॉडीच्या बैठकीत दहावी व बारावीच्या सर्व विषयांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन डिजिटल पद्धतीने करण्याची शिफारस करण्यात आली. यासाठी अनुभवी संस्थांची निवड केली जाणार आहे. आधी काही विषयांसाठीच ही पद्धत 2014 (दहावी) आणि 2015 (बारावी) मध्ये वापरण्यात आली होती.
डिजिटल मूल्यांकनाचा खर्च अंदाजे ₹28 कोटी येणार असून, यामुळे मूल्यांकन अधिक वेगवान व पारदर्शक होईल, असा CBSE चा दावा आहे. विद्यापीठ स्तरावर ही पद्धत आधीच यशस्वी ठरली आहे.
📷
#CBSE #OpenBookExam #DigitalEvaluation #NEP2020 #EducationNews #CBSEनववी #CBSEदहावीबारावी #IndianEducation
—