खालिद का ‘शिवाजी’ चित्रपट वादात; मुंबई अध्यक्ष रुपेश मालूसरे यांची बंदीची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालून निर्मातावर कारवाई करावी

( मुंबई अध्यक्ष रुपेश मालूसरे ) 

चित्रपटावर बंदी घालून निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, मुंबई अध्यक्ष रुपेश मालूसरे यांचे निवेदन

मुंबई–  प्रविणभाऊ पवार 

सद्या महाराष्ट्रात ‘खालिल का शिवाजी” या वादग्रस्त चित्रपटा विषयी अनेक चुकीच्या गोष्टी कानावर पडत आहे. जे इतिहासात कधीच घडलेच नाही. ते या चित्रपटात दाखवण्यासाठी निर्माता प्रयत्न करत आहे.

उदाहरणार्थ

° या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या सैन्यात ३५% मुस्लिम असल्याचा दावा केलाय.

° छत्रपती शिवरायांचे ११ अंगरक्षक हे मुस्लिम असल्याचा दावा.

° रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचा दावा. 

शिवकालीन इतिहासात समकालीन कागदपत्रात असे कोणतेही उल्लेख नाही. म्हणून इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालून निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई विभागीय अध्यक्ष *रुपेश मालूसरे* यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व) मुंबई येथे हिंदू मराठा शिवप्रेमी बांधव या चित्रपटाचा निषेध नोंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

अॅड. धर्मराज जाधव- महामुंबई अध्यक्ष, प्रविणभाऊ पवार – कोकण विभागीय अध्यक्ष, अशोकराव देसाई – मुंबई उपाध्यक्ष, शंभुराजे भोसले – क्षत्रिय मराठा सेवा संस्था अध्यक्ष, बालाजी शिंदे, सतिश जाधव, नितीन सुखदरे, दत्ता जाधव, संतोष राणे, अनिल शेलार, बाबू अनभवने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

Leave a Comment

आणखी वाचा...