🚍 राजापूर – देवाचेगोठणे – सोलगाव – कोतापूर – भू – साटवली – लांजा मार्गे बोरिवली – नालासोपारा – विरार – अर्नाळा एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी
राजापूर :
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी राजापूर डेपोतून देवाचेगोठणे, सोलगाव, कोतापूर, भू, साटवली, लांजा मार्गे बोरिवली – नालासोपारा – विरार – अर्नाळा अशी थेट एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे.
विरार पूर्व येथील प्रतिक जिवन मयेकर व राजापूरचे नंदकिशोर आंबोळकर यांनी दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राजापूर एस.टी. डेपो, मुंबई सेंट्रल मुख्यालय तसेच परिवहन मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी सादर केली. सुरुवातीला “बस उपलब्ध नाही” असे कारण देण्यात आले, त्यानंतर “स्टाफ उपलब्ध नाही” असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
या बससेवेचा प्रस्ताव असा आहे –
राजापूर डेपोतून दुपारी २:१५ वाजता सुटून देवाचेगोठणे, सोलगाव, कोतापूर, भू, साटवली, लांजा मार्गे बोरिवली – नालासोपारा – विरार – अर्नाळा असा मार्ग असावा.
परतीला अर्नाळा वरून दुपारी ३:३० वाजता सुटून विरार – नालासोपारा – बोरिवली मार्गे परत राजापूरपर्यंत सेवा द्यावी.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या मार्गावर गेल्या ५० वर्षांपासून थेट मुंबईसाठी बससेवा नाही. प्रवाशांना राजापूर किंवा लांजा डेपो गाठून बस पकडावी लागते, ज्यामुळे वेळ, पैसा व श्रम वाया जातात.
स्थानिकांच्या मते, ही सेवा कायमस्वरूपी सुरू नसेल तरी सणासुदीच्या काळात तरी सुरू करावी, विशेषत: येणाऱ्या गणेशोत्सवापासून सेवा उपलब्ध करावी, ज्यामुळे सुमारे २ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या या भागातील मोठी गैरसोय दूर होईल.
—
—
📌 हॅशटॅग्स:
#राजापूरबससेवा#RatnagiriNews
#STBusService#राजापूरतेमुंबई#RatnagiriLive#Ganeshotsav2025#MaharashtraTransport
#लांजाबस#VasaiVirar#St demand#MumbaiBus#RajapurLive
#KonkanVartahar#PublicDemand#RatnagiriVartahar