गुहागर येथील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना बाधल्या राख्या, बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा.
गुहागरच्या अधिकाऱ्यांनी मानले विद्यार्थिनींचे आभार
गुहागर (संदेश कदम) – रक्षाबंधन निमित्त गुहागरच्या बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला
. त्यांनी आपले संरक्षण करणारे पोलीस ठाणे गुहागर येथील पोलीस निरीक्षक सचिनजी सावंत व सर्व कर्मचाऱ्यांना तसेच गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार मा. परीक्षित पाटील साहेब यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.
समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना आपले आशीर्वाद दिले आणि त्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. या वेळी शाळेचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शिक्षक राहुल हेगीष्टे आणि जान्हवी आर्यमाने मॅडम उपस्थित होत्या.
#RakshaBandhan #Guhagar #BalbhartiPublicSchool #GuhagarPolice #Tahshildar #IndianCulture #रक्षाबंधन #गुहागर #बालभारतीपब्लिकस्कूल #गुहागरपो
लीस