शिव सहकार सेनेच्या गुहागर तालुका संघटक पदी श्री.विलास गुरव यांची नियुक्ती..!.
आबलोली (संदेश कदम) ……
गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका सचिव श्री. विलास गोविंद गुरव यांची शिव सहकार सेनेच्या गुहागर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून श्री. विलास गोविंद गुरव यांना गुहागर विधानसभेचे विद्यमान आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांनी नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष युवासेना महाराष्ट्राचे सदस्य श्री. विक्रांतदादा जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीच्या नवनिर्वाचित उपसभापती सौ. स्नेहल सचिन बाईत,आबलोली – खोडदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. राजेंद्र साळवी उपस्थित होते. शिव सहकार सेनेच्या गुहागर तालुका संघटक पदी श्री. विलास गुरव यांची नियुक्ती झाल्याबद्दल गुहागर तालुक्यातील विवीध राजकीय पक्षांच्या तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्री. विलास गुरव यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.