🔲 साताऱ्यातील आठ ‘लबाड लाडक्या बहिणी’ सरकारी जाळ्यात!
सरकारी नोकरीत असूनही घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; विभागाची चौकशी सुरू
सातारा प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरत असूनही लाभ घेतलेल्या महिला लाभार्थ्यांमध्ये सरकारी सेवेत असलेल्या महिलांचाही समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. महिला व बालविकास विभागाच्या चौकशीत राज्यभरातील तब्बल १,१८३ महिला कर्मचारी अपात्र ठरल्या असून यामध्ये साताऱ्यातील ८ महिला कर्मचारी आहेत.
📌 या यादीत सातारा जिल्हा परिषदेतील आठ महिला कर्मचार्यांची नावे स्पष्ट झाली असून, त्यांच्या संदर्भातील अंतिम कार्यवाहीसाठी शासनाकडून निर्देशाची प्रतीक्षा आहे. या घडामोडीमुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ माजली आहे.
🟣 अपात्र महिलांची यादी (सातारा झेडपी) :
अश्विनी चंद्रकांत कांबळे
तनुजा बाळू झिमल
सुक्रीया अशोक गुरव
संध्या सतीष कांबळे
प्रतिभा धनंजय विधाते
प्रियांका उमेश गार्डी
अंकिता रामचंद्र लाडी
शुभांगी संदीप रासकर
या सर्व महिला कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील विविध विभागांत कार्यरत असूनही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
🔍 प्रशासनाकडून पुढील कारवाईचे आदेश आल्यानंतर या प्रकरणात कार्यवाही करण्यात येणार आहे.
—
🔖 हॅशटॅग्स :
#लाडकीबहीण #सातारा #शासकीयभ्रष्टाचार #महिलाआयोग्य #RatnagiriVartah