🚫 मनोज जरांगेपाटील यांना हायकोर्टाचा धक्का; मुंबईत आंदोलनासाठी ‘नो एन्ट्री’!
गणेशोत्सवाच्या काळात आझाद मैदानावर आंदोलनास मज्जाव; पर्यायी ठिकाणीच निदर्शनांचा परवाना मिळणार
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढ्याची हाक देत मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा इशारा देणारे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हायकोर्टाने स्पष्ट मज्जाव केला आहे.
आज मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एमी फाउंडेशन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत, “लोकशाहीत मतभेद मांडण्याचा हक्क आहे, परंतु निदर्शने केवळ नियुक्त ठिकाणीच करता येतात आणि पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास परवानगी नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला ओबीसी गटांतर्गत 10 टक्के आरक्षणाचा निर्णय मंगळवारपर्यंत घ्यावा, अन्यथा 29 ऑगस्टपासून मुंबईत अनिश्चितकालीन उपोषण सुरू करणार असा अल्टिमेटम दिला होता.
मात्र न्यायालयाने निदर्शनांसाठी अर्ज दाखल करण्याचे स्वातंत्र्य प्रतिवादींना आहे, पण अंतिम निर्णय कायद्यानुसार सरकार घेईल, असे स्पष्ट केले. यासोबतच, “मुंबईतील जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून सरकार नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा देऊ शकते,” असेही खंडपीठाने म्हटले.
गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणूनच हायकोर्टाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
📸 फोटो
—
🔖 हॅशटॅग्स :
#ManojJarangePatil #MarathaReservation #MumbaiHighCourt #Ganeshotsav2025 #MaharashtraPolitics