आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

 

देवरुखच्या विद्यार्थ्यांनी चमक दाखवत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला; प्राचार्य व शिक्षकांकडून अभिनंदन 

संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, देवरुख येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

१९ वर्षाखालील गटात निवड झालेले विद्यार्थी:

१️⃣ वेद प्रदीप लिंगायत – प्रथम (१२वी वाणिज्य)

२️⃣ भाग्यलक्ष्मी गणेश मुळे – द्वितीय (१२वी संयुक्त-वाणिज्य)

३️⃣ प्रणित मिलिंद मांडवे – चतुर्थ (१२वी वाणिज्य)

4️⃣ साई प्रकाश हळदणकर – पाचवा (१२वी वाणिज्य)

संघ व्यवस्थापक म्हणून क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांनी जबाबदारी संभाळली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना समन्वयक प्रा. धनंजय दळवी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी क्रीडा विभागातील प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे, प्रा. संदीप मुळये व प्रा. शिवराज कांबळे यांची उपस्थिती होती.

तसेच संसाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

 

हॅशटॅग्स:

#बुद्धिबळस्पर्धा #जिल्हास्तरीयस्पर्धा #आठल्येसप्रेपित्रेमहाविद्यालय #देवरुख #RatnagiriNews #विद्यार्थीयश

 

 

 

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

Leave a Comment

आणखी वाचा...