मोहन भागवतांचा खुलासा : “७५ वर्षांनंतर निवृत्तीचा नियम नाही, संघ सांगेल तसा निर्णय घेऊ”
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ७५ वर्षांनंतर सक्रिय राजकारणात राहणार का निवृत्ती घेणार, यावरील चर्चेला अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पूर्णविराम दिला आहे. “मी कधीही असं म्हटलं नाही की ७५ वर्षांनंतर निवृत्त व्हायलाच पाहिजे. संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षपूर्ती निमित्त आयोजित तीन दिवसीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदींच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना फेटाळले. “संघाला गरज असेल तोपर्यंत मी कार्यरत राहणार आहे. कुणी ८० व्या वर्षी मला शाखेत काम करायला सांगितलं तर तेही मला करावं लागेल. निवृत्ती ही वैयक्तिक गोष्ट नाही, तर संघाच्या कार्याशी जोडलेली आहे,” असे भागवत यांनी नमूद केले.
भाजप-आरएसएस नातेसंबंध स्पष्ट
मोहन भागवत यांनी भाजप आणि संघाच्या नात्याबद्दलही स्पष्ट भूमिका मांडली. “भाजपबद्दल संघ सगळं ठरवतो यात काहीच तथ्य नाही. आम्ही भाजपला सल्ला देऊ शकतो, पण निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचाच आहे,” असे ते म्हणाले. “भाजपचा अध्यक्ष ठरवण्यात संघाची भूमिका आहे का?” या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं – “जर निर्णय आम्ही घेतले असते तर इतका वेळ लागला नसता