न्यायासाठी विनामूल्य लढाई – ॲड. सुनील पाटील, ॲड. परेश पाटील व ॲड. हर्षल रणधीर मैदानात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विनामूल्य लढाई – ॲड. सुनील पाटील, ॲड. परेश पाटील व ॲड. हर्षल रणधीर मैदानात

पाचोरा (गुरुदत्त वाकदेकर) :

तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. या घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नाकारला गेला असून, कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक तपासात व पहिल्या टप्प्यात सुमारे १ कोटी २० लाखांच्या जवळपास अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाचोरा न्यायालयात ॲड. सुनील पाटील (मो. ८८८८२६१८८३), जिल्हा सत्र न्यायालय जळगाव येथे ॲड. परेश पाटील (मो. ८६२५०३४४४४) आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ॲड. हर्षल रणधीर (मो. ९७६६३९९८८५) यांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य न्यायालयीन लढाई सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

या प्रकरणात तीनही वकिलांनी घेतलेला निर्णय शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरतो. कारण न्यायालयीन लढाईसाठी मोठा खर्च येतो आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तो परवडणारा नसतो. वकिलांनी नि:शुल्क खटला लढवण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असुरक्षितता दूर झाली आहे. शेतकरी वर्गात या निर्णयाचे स्वागत होत असून, “आता आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी एकमुखाने मागणी केली जात आहे.

सामाजिक व जनहिताची जबाबदारी पत्करून सत्यस्थिती बाहेर आणण्यात आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचे योगदान अनन्यसाधारण ठरले आहे. त्यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करून, अन्न-पाणी त्याग करून हा विषय उचलून धरला. शेतकरी वर्गाचा आवाज त्यांनी प्रामाणिकपणे माध्यमांतून पोहोचवला आणि आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले.

शासनाच्या योजनांवरील बनावट कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याने, सर्व स्तरांवरून “आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये” अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या सुनावण्या, विशेषतः अटकपूर्व जामिनावर होणाऱ्या युक्तिवादात, सरकारी वकिलांसोबत या वकिलांची ठाम भूमिका आरोपींच्या भवितव्याचा निर्णय घेणारी ठरेल.

पाचोरा न्यायालयात ॲड. सुनील पाटील, जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. परेश पाटील आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ॲड. हर्षल रणधीर यांची उपस्थिती शेतकऱ्यांच्या मनाला आत्मविश्वास देणारी आहे. तर आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणूनच हा लढा निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी बांधवांचे विश्वास भंग झाल्याचे असून, त्यांच्या बाजूने उभे ठाकलेले वकील आणि पत्रकार-आंदोलनकर्त्यांची एकजूट ही लढाईला नवी ताकद देणारी आहे. शेतकरी न्यायासाठी सुरू झालेली ही लढाई आता फक्त पाचोऱ्यापुरती मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. शेतकरी वर्गाने ठाम निर्धार केला आहे की, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा