रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी यांनी घेतली रामदासजी आठवले यांची भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी यांनी घेतली रामदासजी आठवले यांची भेट

आबलोली (संदेश कदम)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय नेते मान. रामदासजी आठवले यांची सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विषयांवर सकारात्मक चर्चा करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिनाचे नियोजन आणि महाबोधी बुद्ध विहार मुक्ती संदर्भात आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दलित मित्र पुरस्कार प्राप्त आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक दिलीपजी काकडे सर, पुणे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रुके कार्यकर्ते उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...