🔥 मोठी बातमी!
🟣 हायकोर्टाचा कडक आदेश : मराठा आंदोलकांनी उद्या दुपारी ४ पर्यंत दक्षिण मुंबई रिकामी करावी!
मुंबई ~ प्रतिनिधी
👉 मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसर, चर्चगेट स्थानक, हुतात्मा चौक परिसरात रस्ते ठप्प झाले आहेत.
👉 या पार्श्वभूमीवर दाखल जनहित याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर हायकोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की,
- आझाद मैदान वगळता सर्व रस्ते उद्या (२ सप्टेंबर) दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांनी मोकळे करावेत.
- सरकार व पोलिसांनी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
- आंदोलकांना आझाद मैदानासाठी सध्या कोणतीही परवानगी नसल्याचेही नमूद करण्यात आले.
👉 गणेशोत्सव काळात मुंबई ठप्प होऊ नये यासाठी हे आदेश दिले जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
👉 न्यायालयाने राज्य सरकारला हेही आदेश दिले की, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात यावेत.
📌 पुढील सुनावणी उद्या दुपारी ३ वाजता नियमित खंडपीठासमोर होणार आहे.
✅ हॅशटॅग्स :
#MarathaReservation #ManojJarange #MumbaiHighCourt #AzadMaidan #MarathaAndolan #MumbaiTraffic #Ganeshotsav2025
📷 फोटो