कथा हरतालिका ची….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आज हरतालिका व्रत आहे.पार्वती मातेने भगवान शंकरास प्राप्त करण्यासाठी किती

कथा हरतालिका व्रत पूजन

कठीण व्रत आचरिले तसेच आपल्या आराध्य दैवतेविषयी कशी दृढ श्रद्धा होती ते आपण हिंदु म्हणून ही घटना नुसती व्रताच्या दृष्टीने न पाहता एक आदर्श म्हणून पाहावी‌. आपल्या आदर्शांची ,संस्कृतीची धर्माची जेंव्हा टिंगलटवाळी होतो ती टिंगलटवाळी आपलेच सुशिक्षित लोकच करतात वृत्तपत्रातून , पुस्तकांतून करतात तेंव्हा आपण किमान त्याचा निषेध शब्दांना शस्त्रांची धार देत करावा.

शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वती तपश्चर्या करीत होती. तिची ती तपश्चर्या अत्यंत उग्र होती. उन्हाळ्यात ती पंचाग्निसाधन करी. हिवाळ्यात गळ्याइतक्या पाण्यात उभी राही. पावसाळ्यात उघड्या आकाशाखाली एखाद्या दगडावर बसून तप करी. तिची परीक्षा पाहण्याकरिता भगवान शंकर बटुवेषाने तिच्याकडे आले. पार्वतीने अतिथी म्हणून त्यांचे स्वागत केले. शंकरांनी आरंभी मधुरपणाने तिच्या प्रकृतीची, परिस्थितीची विचारपूस केली. आणि मग म्हणाले, ‘राजवैभवात सुखाने नांदावे अशी असलेल्या तुझ्यासारख्या कोमल शरीराच्या सुंदर तरुणीने, वानप्रस्थाला शोभावे असे हे कठोर व्रत का आरंभिले आहे?’ पार्वतीने ‘शंकराच्या प्रामेसाठी’ हे केल्याचे सांगताच तो बटू उपहासाने हसला. त्याने शंकराची नानाप्रकारे निंदा केली. त्याच्याशी योग होणे किती विसंगत आणि हास्यास्पद ठरणारे आहे. हे विविध रीतीने समजावून सांगितले. आणि शेवटी तो म्हणाला- ‘उपवर वधूकडून वराविषयी ज्या ज्या काही अपेक्षा असतात त्यातील एक तरी स्मशानवासी भूतनाथाजवळ आहे. का?’

 

वपुर्विरूपाक्षमलक्ष्यजन्मता ।

दिगंबरत्वेन निवेदितं वसु ।

वरेषु यद् बाल मृगाक्षि मृग्यते ।

तदस्ति किं व्यस्तमपि त्रिलोचने |

‘वर निदान नाकी डोळस नीटस हवा. तुझे डोळे कसे हरिणशावकाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर, मोठे आणि तेजस्वी! आणि तू ज्याच्याकरिता खुळेपणाने अशी घोर तपश्चर्या करते आहेस, तो शंकर मात्र कुरूप डोळ्यांचा. वर कसा कुलीन असावा. याच्या आईबापाचा तर पत्ताच नाही आणि दिगंबर राहतो. तेव्हा संपत्ती किती आहे हे उघडच कळते. ज्याला वस्त्र नेसणे सुद्धा परवडत नाही, त्याची श्रीमंती किती वाखाणावी!’

 

त्या बटूच्या बोलण्याने पार्वती संतापली. तिने त्याचा प्रत्येक आरोप खोडून काढला. आणि ती थोड्या उपहासाने म्हणाली, ‘तुझ्या या मूर्खपणाच्या बोलण्यात भगवान शंकराविषयी एक गोष्ट मात्र योग्य आणि चांगली सांगितलीस. अरे! ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली अशा ब्रह्मदेवालाही ज्याने उत्पन्न केले, त्याच्या आईबापाचा ठावठिकाणा नसेल यात काय नवल आहे? जो अनादि, अनंत आहे, त्याचे कुल न सांगता येणे अगदी स्वाभाविक आहे.’ आणि नंतर ती आपल्या सखीकडे वळून म्हणाली- ‘सखे! या बटूला आता आश्रमाच्या बाहेर काढ. पुन्हा बोलण्यासाठी त्याचे ओठ फुरफुरू लागले आहेत. तो असेच काहीतरी वेडेवाकडे बोलणार. अगं! शास्त्र असे आहे की थोरांची जो निंदा करतो, त्यालाच केवळ पाप लागत नाही तर ती निंदा ऐकून घेणाराही पापी ठरतो.

संदर्भग्रंथ : कुमारसंभव : महाकवि कालिदास 

         आत्मसंयमयोग : पू.स्वामी वरदानंद भारती

उमापती महादेव की जय

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

दत्त माझा मी दत्ताचा फेसबुक ग्रुप वरून साभार????

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam