
मांडवी एक्सप्रेस (१०१०४) रेल्वेमधून दरवाजातून खाली पडलेल्या प्रवासाचे वाचविले प्राण.…..
▶️ गोवळकोट विद्यालयातील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर यांचे रेल्वे प्रशासनाने केले त्यांचे विशेष कौतुक
चिपळूण (वार्ताहर) :-
चिपळूण तालुक्यातील सुपुत्र श्री.योगेश पेढांबकर हे गोवळकोट एज्युकेशन सोसायटी या संस्थेतील माध्य.शिक्षक असून कायम शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये कायम तत्पर असतात. काल रत्नागिरी येथे सी.ई.ओ च्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्ह्यातील शिकाकांची सभा होती. त्यावेळेस परतीच्या रेल्वे प्रवासादरम्यान माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत सामान्य नागरिकांना न्याय देत असतात. यातच
काल दुपारी मांडवी एक्सप्रेसने (10104)प्रवास करीत असताना वैभववाडी येथील श्री.पाठक हा प्रवासी हा ठाणे येथे जाण्यास जनरल डब्यामध्ये बसला होता. रेल्वे कामथे येथे दुपारी ठीक 4.40 च्या दरम्यान क्रॉसिंगला थांबली असता अचानक एक युवा तरुण चक्कर येऊन तो दरवाज्यातून खाली कोसळला. हा प्रकार प्रत्यक्ष योगेश पेढांबकर यांच्या निदर्शनास आल्यावर तातडीने रेल्वेतून खाली उतरत त्याला उचलण्याचा प्रयत्न केला.परंतु तेवढे शक्य नसल्याने मदतीसाठी प्रवासामध्ये आवाज दिला. दगडाचा मार बसल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तसेच त्याच्या पायाला व हाताला तोंडाला खूप जखम झाली होती.अशा परिस्थितीत तातडीने रेल्वेतील काही प्रवाशांची सर्वांचे मदत घेत त्याला तिथेच प्राथमिक उपचार केले.
या सर्व घडलेल्या प्रकारावर रेल्वेतील सर्व प्रवासी यांनी श्री.योगेश पेढांबकर यांच्या या धाडसाचे विशेष कौतुक केले. आणि ऐन गणेशोत्सव काळात तुम्ही एका व्यक्तीचे प्राण वाचवले, हे पुण्य तुम्हाला मिळेल. अशा प्रकारची चर्चा ही रेल्वेमध्ये होत होती.
विशेष बाब…म्हणजे ज्यावेळी हा इसम व्यक्ती नाव श्री.पाठक रेल्वेमधून दरवाजातून खाली पडला. त्यावेळी तो दारू पिऊन पडला असेल, या सर्व भावनेने कोणीही व्यक्ती मदतीस धावत येत नव्हता. परंतु सामजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार निस्वार्थ चळवळ महा.राज्य प्रमुख मार्गदर्शक श्री.योगेश पेढाबकर यांनी आवाज दिल्यानंतर काही चार-पाच तरुण येऊन एकत्रित येवून त्याला ट्रेनमध्ये घेतल्यावर काही वेळातच शुध्दीवर आल्यावर श्री.योगेश पेढांबकर यांना हात जोडून आभार मानले.व माझी बायको व मुले आठवली.अशा शब्दात भावना व्यक्त केली.
या बाबत श्री.योगेश पेढांबकर यांच्या या धाडसाचे रेल्वे प्रशासनातून तसेच सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.या घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार व श्री.योगेश पेढांबकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.