अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

गुहागर

मासू  | दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मासू गावातील प्रगतशील शेतकरी श्री. मनोज भोजने यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या आगीत अंदाजे १०० आंब्याची झाडे, ५० पोकळीची झाडे तसेच सुमारे ५०० काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. संबंधित शेताचे एकूण क्षेत्र सुमारे पाच एकर असून या आगीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

या घटनेची तात्काळ दखल घेत कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर नुकसान हे नैसर्गिक किंवा अपघाती नसून अज्ञात व्यक्तीच्या जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

श्री. मनोज भोजने हे प्रगतशील शेतकरी असून त्यांनी अनेक वर्षे मेहनतीने उभे केलेले फळबागांचे उत्पादन या घटनेमुळे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाकडून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात   गुहागर | ता. ०६...
Read More
मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज  १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू - भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार आबलोली (संदेश कदम) निवडणुकीचे...
Read More
पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड   लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण...
Read More
माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी गुहागर मासू  | दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी...
Read More
अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान  शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात अहिल्यानगर |...
Read More
पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी श्रीरामपूर | प्रतिनिधी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज...
Read More
टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा
Play sound