चिपळूण पंचायत समितीत उबाठा सेनेच्या गटनेतेपदी गौरव पाटेकर
आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार; तरुण नेतृत्वावर पक्षाचा विश्वास
चिपळूण : नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) सेनेच्या चार सदस्यांनी विजय मिळवत आपली ताकद दाखवली. उमरोली गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या गौरव पाटेकर यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्षीय मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
२००९ पासून पक्षात सक्रिय असलेल्या पाटेकर यांनी संघटन बळकटी, जनसंपर्क, तसेच ग्रामीण विकास, युवक-महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांच्या कामांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी काळात पारदर्शक व लोकाभिमुख विकासासाठी काम करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
















