कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ‘धवल घाग, व्यापारी संकुल, चिपळूण’ येथे पार पडणार आहे.

या कार्यशाळेत निवडक लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, बदलत्या राजकीय परिस्थितीत प्रभावी भूमिका कशी पार पाडावी, जनतेच्या प्रश्नांना कशा प्रकारे सामोरे जावे, तसेच पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभ
शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यशाळेचे उद्घाटन मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी खासदार श्री. हुसेन दलवाई प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रशिक्षण विभाग प्रमुख श्री. आशुतोष शिर्के शिबिराची रूपरेषा स्पष्ट करणार आहेत.

विविध विषयांवर मार्गदर्शन
शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी “शहरांमधील बदलते राजकारण आणि आपण”, “जनतेचे प्रश्न आणि आपली भूमिका”, तसेच “धर्म, संस्कृती आणि धर्मनिरपेक्ष राजकारण” या महत्त्वपूर्ण विषयांवर सत्रे होणार आहेत. गटानिहाय चर्चेद्वारे संवाद साधला जाणार आहे.

समारोप कार्यक्रम
रविवार, दि. १ मार्च रोजी विविध सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींसोबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता समारोप सोहळा पार पडणार असून, यावेळी मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा कोकण विभाग सहप्रभारी श्री. यू. बी. व्यंकटेश आणि आमदार श्री. भाई जगताप उपस्थित राहणार आहेत.

सहभागी प्रतिनिधींनी दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत चिपळूण येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महा सचिव श्री. गुरबिंदरसिंग बच्छेर (मो. 9821441616) यांच्याशी संपर्क साधावा, असे रत्नागिरी ब्लॉक काँग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी कळविले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

🏥 सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न   रत्नागिरी, २४ फेब्रुवारी २०२६: डॉ....
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगार यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता गुहागर -(मंगेश जाधव). गुहागर तालुक्यातील...
Read More
स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

🎨 तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन. गुहागर -तालुक्यातील तवसाळ गावातील नार्वेकर परिवाराने शिक्षण...
Read More
तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण...
Read More
कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट...
Read More
वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी

२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारे...
Read More
२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी नवीमुंबई (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट १...
Read More
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद

गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद गोवा, २४ फेब्रुवारी २०२६: World...
Read More
गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद
Play sound