स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगार यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता
गुहागर -(मंगेश जाधव). गुहागर तालुक्यातील स्वामी समर्थ मठ साखरी आगर यांच्या वतीने
परम पूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून दृर्ग संवर्धन मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत स्वामी समर्थ मठ साखरी आगार मधील लहान थोर मंडळी तसेच स्व बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदिप तुकाराम खेतले, सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. विनय काताळकर, नवनीत मोहीते, पाभरे गावचे पोलीस पाटील अजित आग्रे साहेब, श्री.अशोक बागकर, श्रीधर पिंपरकर, अर्चना पाटील, उदय माईन ही सर्व मंडळी या मोहिमेला उपस्थित होते.
पाभरे गावचे पोलीस पाटील अजित आग्रे साहेबांनी आलेल्या सर्व शिवप्रेमी तसेच स्वामी समर्थ भक्तांचे आभार मांडले














