धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

विद्यार्थी गुणगौरव, महिला गौरव सोहळाहि उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबई (रजि.) या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि धोपावे श्री.हनुमान मंदिर विश्वस्त अध्यक्ष माननीय श्री.विलास यशवंत निंबकर यांच्या उपस्थितीत कृष्णा जैजुरकर क्लासेस, पर्ल सेनापती बापट मार्ग दादर ( पश्चिम ) येथे संपन्न झाली.

या सभेच्या प्रारंभी मान्यवर श्री.विलास निंबकर,श्री.अनिल चव्हाण,मा.श्री.वामन पवार,मा.श्री.प्रकाश डावळ यांच्या कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून , दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत गीताने सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे सरचिटणीस श्री.अनिल गोविंद भुवड यांनी दि.२४ एप्रिल २०२४ वार्षिक सर्वसाधारण सभा, गावपातळीवर हनुमान मंदिर जीर्णोद्धार निधी संदर्भातील सभा आणि आवक,जावक पत्राचे वाचन केले. त्यानंतर यथोचित मान्यवर आणि गावातील जेष्ठ नागरिक, आणि महिला यांचा पुष्पगुच्छ, शाळ देऊन सन्मान करण्यात आला. श्री.अंकुश नाटेकर ( महाराष्ट्र पोलीस) श्री.प्रमोद सावंत, श्री.राजेश सावंत, श्री.किशोर पवार,सौ.स्नेहल कुळे,सौ.कविता सावंत,सौ.ईशा भेकरे आदी.कार्यकत्यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर

मंडळाचे खजिनदार श्री.प्रकाश महादेव डावळ यांनी जमा,खर्च सावंत , मा.श्री.विनय कुळे , मे. के.के.फॅशन वर्ल्ड ग्रुप* यांचा “सन्मानपत्र”आणि “सन्मानचिन्ह” देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा निमित्ताने कु.पार्थ लहु नाटेकर – एस.एस.सी. ८६.२०%, कु.तन्वी अनिल भुवड – एच.एस.सी.६५%, श्री.अंकुश गोविंद नाटेकर – ( महाराष्ट्र पोलीस) , सौ.ईशा ईतेश भेकरे – कुपर रुग्णालय ( परिचारिका ), सौ.भाग्यश्री मंगेश भुवड – सुर्या हॉस्पिटल ( परिचारिका ), डॉक्टर श्री.वैभव राजन दळी (MBBS ), कु.विराज सुनिल कुळे – सायन्स फॅस्टीवल, कु.मनाली महेश शिगवण – अधिवक्ता, श्री.लक्ष्मण गंगाराम भेकरे – अधिवक्ता, कु.पुजा नरेश कुळे -बी.फार्मसि, कु.मयुरी प्रविण कुळे- एम.कॉम, अक्षता अरुण भुवड -एम.कॉम, कु.भावेश राजेश सावंत -एच.एस.सी.( क्रिकेट सिझन बॉल ) कु.मेहक अल्ताफ खान -एच.एस.सी.७४.५०% प्राजक्ता अरुण सावंत- एम.एस.सी.( विज्ञान पारंगत ), सायली अरुण सावंत – एम,एस,सी. ( विज्ञान पारंगत ), कु.यशिका अनिल कुळे( बेसिक संगणक), कु.नागेश प्रमोद सावंत ( बॉडी बिल्डर ) कु.रुतुजा महेश चव्हाण,१५ वी* यांचा भेटवस्तू देऊन

सन्मान करण्यात आला.

श्री.अंकुश नाटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई चांगले काम करीत आहे.या मंडळातील कार्यकर्ते प्रामाणिक गावाची सेवा करीत आहेत.मी स्पष्टच बोलतोय गावात राजकारण खुपच चाललंय गावात एखादी योजना राबवली जाते त्यावर राजकारण चालू होते त्यामुळे गावाचा विकास होत नाही.ही वस्तुस्थिती आहे.महाभारतातील उदाहरणे देऊन सभासंदांची मनं जिंकली. मंडळाने १२०/- रुपये वार्षिक सभासद वर्गणी ठेवली आहे.ती फारच कमी असुन वाढवावी लागेल असा मोलाचा सल्ला दिला.मला वेळ भेटेल त्यावेळी मी आर्वजुन मंडळाच्या उपक्रमात सहभागी होईल असे सांगितले. त्यानंतर श्री.राजेश सावंत यांनी मंडळाच्या वर्षातून दोन सभा असायला हव्यात गणपती मध्ये गावपातळीवर एक सभा व्हावी असे सुचविले.

तर श्री.विलासजी निंबकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या वडीलांनी गावातील पहीली शाळा हनुमान मंदिरात चालू केली.सर्वांना प्रवेश होता.कुठलाही भेदभाव नव्हता. “आमराई” नाटक झालं त्यावेळी कलाकार गावातीलच होते.धोपावे ग्रामविकास मंडळाने चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार निधी साठी प्रयत्न केला त्याबद्दल शतशः आभार मानले.माझ्या वडीलांनी जसं जपलं , त्याप्रमाणेच मी ही प्रत्येक वाडीत सलोख्याचे संबंध आहेत.आताही सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.राजकारण ठेवा बाजुला सर्वांनी एकत्र या असे आवाहन करुन मंडळाला शुभेच्छा दिल्या.

धोपावे ग्रामविकास महिला मंडळाची स्थापना करण्यात आली.त्यावेळी अध्यक्ष सौ.कविता राजेश सावंत, सेक्रेटरी सौ.स्नेहल सुनिल कुळे, खजिनदार सौ.इशा इतेश भेकरे* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित महीलांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर “पैठणीचा खेळ” रंगला “लकी ड्रॉ” पद्धतीने दोन पैठणी ठेवण्यात आल्या होत्या.यामध्ये प्रथम क्रमांक सौ.शुंभागी मनोज पवार यांनी बाजी मारली, तर द्वितीय क्रमांक सौ.अमिषा अनिल भुवड यांनी पटकावला. तसेच धोपावे ग्रामविकास मंडळ ( मुंबई) रजि.मंडळाची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष -श्री.प्रमोद शांताराम सावंत.

अध्यक्ष -श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण,उपाध्यक्ष – श्री.मनोज शांताराम पवार,उपाध्यक्ष -श्री.कृष्णा शांताराम कुळे,

सरचिटणीस -श्री.अनिल गोविंद भुवड,सहचिटणीस -श्री.किशोर शंकर पवार,

सहचिटणीस -श्री.विनय कृष्णा कुळे,खजिनदार -श्री.सुनिल प्रकाश कुळे,सहखजिनदार – श्री.संतोष बाळु वरवेलकर तसेच कार्यकारणी सदस्य

श्री. संदिप चाळके,श्री.वामन पवार,श्री.बलवंत पवार, श्री.लवु पवार,श्री.प्रकाश डावळ,कु.प्रथमेश टेमकर,श्री.सुनिल डावळ,श्री.चंद्रकांत कुळे,श्री.सुरेश कुळे,श्री.राजेश सावंत,श्री.अनिल शिंदे,श्री.विजय सावंत,श्री.भुषण गुरव,श्री.भालचंद्र निमकर,श्री.अंकुश नाटेकर,श्री.निकेश जाधव,श्री.लक्ष्मण भेकरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

श्री.अरुण सावंत यांनी धोपावे ग्रामविकास मंडळाला पाठविण्यात आलेले पत्र विषय काटेरी झाडं, करवंदी सपाट करुन कांजु ,आंबा, कोकण फणस लागवड करणे. हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण होईल.जागा मोकळी होईल.झांडाची लागवड होईल शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण यांनी आम्हांला विश्वासाने परत अध्यक्ष पदावर घेतलं आहे त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.आज मिटींगला उपस्थित राहील्या बद्दल तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.गावात सर्वांना सोबत घेऊन काम करु, गावात योजना चालू आहेत, पाणी,रस्ता त्याबद्दल संबंधित अधिकारी, मंत्री यांच्या कडे पाठपुरावा करु.आपण सर्वांनी सहकार्य करा.पुढील वर्षी महिला मंडळाचा विशेष हळदीकुंकू समारंभ आयोजित करु,आपले कायदे अधिकार यावर माहीती देण्यासाठी “चर्चा सत्र” ठेऊ.गावातील ग्रामपंचायत , जेष्ठ नागरिक यांच्या कडे समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.सर्वांनी सहकार्य करा असे भावनिक आवाहन केले. तर धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई रजि मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि महिला सन्मान या सभेचे सुत्रसंचलन श्री.अनिल गोविंद भुवड* यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करुन अध्यक्षांच्या परवानगीने सभा सायंकाळी ७:३० राष्ट्रगीत बोलुन सभा समाप्त करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट आबलोली (संदेश कदम) जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी...
Read More
गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम नाट्यविश्वातून जुळली ओळख; दिग्दर्शक-विक्रमशील कलाकार विक्रांत बदरखे यांच्यासोबत आयुष्याची...
Read More
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६' ची महाविजेती साखरपा गावामध्ये जल्लोष; अभिनेता राकेश बापट ठरला...
Read More
संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती...
Read More
आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर तीन वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार दंड; राज्यभरात महिला...
Read More
रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष नवीमुंबई (मंगेश जाधव)बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा...
Read More
लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)-शिवसेना पक्षाची बांधणी युद्धपातळीवर सुरु असून याचाच...
Read More
BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार  रत्नागिरी - जि .प आदर्श...
Read More
 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड प्रतिनिधी :- निलेश रहाटे    कल्याण डोंबिवली...