मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई विभागीय बैठक वतीने बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आनंद नगर, वाकोला पोलीस स्टेशनच्या मागे, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे पार पडली. ही बैठक मुंबई अध्यक्ष रुपेश मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान महामुंबई अध्यक्ष ॲड. धर्मराज जाधव यांनी भूषविले.

बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष ॲड. धर्मराज जाधव यांनी प्रास्ताविक करून सभेची रूपरेषा स्पष्ट केली व पुढील कामकाजासाठी मुंबई अध्यक्षांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. अध्यक्ष रुपेश मालुसरे यांनी आगामी काळातील संघटनात्मक उद्दिष्टे, समाजाभिमुख उपक्रम आणि युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थित सभासदांनी स्वतःचा अल्प परिचय करून दिल्यानंतर राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीदरम्यान काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मालेगाव महापालिकेत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याबद्दल तसेच काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हे मराठा समाजाचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे मत व्यक्त करून याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत झालेल्या अपमानास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित भगिनीला भेटून सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले.

राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी मार्गदर्शन करताना समाजातील युवकांनी रोजगार, उद्योग व व्यवसायाकडे वळावे, तसेच परदेशातील संधींचा लाभ घेण्यासाठी पात्रता सिद्ध करावी, असे आवाहन केले. युवकांना सक्षम बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारी शिबिरे आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “आता रडायचे नाही, तर लढायला शिकले पाहिजे; हाताला काम आणि पोटाला अन्न मिळाले तरच समाज सक्षम होईल,” असे ते म्हणाले. समाजात बौद्धिक चर्चा वाढवून तरुणांना संघटनेशी जोडण्याचेही त्यांनी सुचविले.

मुंबई अध्यक्ष रुपेश मालुसरे यांनी जाहीर केले की, दि. २९ मार्च २०२६ रोजी “मराठा उद्योग व रोजगार” विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी संस्था व मुंबई बँक यांच्या माध्यमातून विविध रोजगार योजनांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मारीगोल्ड हॉल, सांताक्रूझ, मुंबई येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने दक्षिण मध्य मुंबई दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी सर्व उपस्थित पदाधिकारी व सभासदांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा

मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा मुंबई | प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई विभागीय बैठक...
Read More
मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा

दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

दिवा परिसरातील धाबे बनलेत 'ओपन बार'; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी ​विशेष प्रतिनिधी /अरविंद कोठारी दिवा:...
Read More
दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी   वसईतील सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा संकल्प कुटुंबियांनी केला पूर्ण नवीमुंबई (मंगेश जाधव): वसई...
Read More
आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

🚨 चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा चिपळूण: तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र (ACB) कडे तक्रार दाखल केल्यानंतर चिपळूण...
Read More
चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न विद्यार्थी गुणगौरव, महिला गौरव सोहळाहि उत्साहात संपन्न आबलोली (संदेश...
Read More
धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि जि.प. आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांचा स्तुत्य...
Read More
आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

🏥 सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न   रत्नागिरी, २४ फेब्रुवारी २०२६: डॉ....
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगार यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता गुहागर -(मंगेश जाधव). गुहागर तालुक्यातील...
Read More
स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

🎨 तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन. गुहागर -तालुक्यातील तवसाळ गावातील नार्वेकर परिवाराने शिक्षण...
Read More
तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण...
Read More
कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये
Play sound