सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग १७ व्या वर्षीही एमकेसीएल कडून गौरव.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग १७ व्या वर्षीही एमकेसीएल कडून गौरव.

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची विभागी बैठक सिंधुदुर्ग येथील हॉटेल आराध्या सभागृहात पार पडली. हा पुरस्कार एमकेसीएलच्या मॅनेजमेंट डायरेक्टर समीर पांडे यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी आणि संचालिका सावी साळवी यांनी एकत्र स्वीकारला.

आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर संगणक प्रशिक्षण संस्था गेली २५ वर्षापासून आबलोली येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे. सलग १७ वर्ष संस्थेला पुरस्कार प्राप्त होत आहे.सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन नोकरीला लावणे, महाराष्ट्र ऑलंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षा आयोजन, इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी संदर्भात मार्गदर्शन, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन, फ्युचर वेध इ-टेस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स मार्गदर्शन, सांगा टक्के बक्षीस पक्के उपक्रम, इयत्ता दहावी- बारावी अंतिम निकालपत्र वाटप, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम, विद्यार्थी करियर मार्गदर्शन आणि स्नेहसंमेलन, जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त कार्यशाळा आयोजन, विविध शिबिरांचे आयोजन, दिनदर्शिका भेट, महिलांसाठी डिजिटल सहेली आदी उपक्रम सातत्याने राबविल्याने सलग १७ वर्षीही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपल्या MS-CIT केंद्राच्या 24 वर्षाच्या प्रवासात हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. संगणक साक्षरते सोबत विद्यार्थ्यांना जॉब रेडी सुद्धा करत आहोत. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला. या यशात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि सर्व सहकाऱ्यांची आठवण पुरस्कार स्वीकारताना आली. पुरस्कारामुळे संस्थेचे नाव उंचावले आहे या यशामागे सुयश कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्थेतील सर्वच सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.हा अवॉर्ड मी माझ्या केंद्रात संगणक ज्ञान मिळवलेल्या तसेच कोर्स पूर्ण करून जॉब प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित करतो. अशी कृतज्ञता संदेश साळवी यांनी व्यक्त केली.

पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएलचे विभागीय सहव्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, तुषार सर, कोकण विभाग समन्वयक मंगेश जाधव, रत्नागिरी जिल्हा समन्वयक संतोष कोलते, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली तसेच जिल्ह्यातील सर्व संगणक संस्थाचालक उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट आबलोली (संदेश कदम) जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी...
Read More
गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम नाट्यविश्वातून जुळली ओळख; दिग्दर्शक-विक्रमशील कलाकार विक्रांत बदरखे यांच्यासोबत आयुष्याची...
Read More
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६' ची महाविजेती साखरपा गावामध्ये जल्लोष; अभिनेता राकेश बापट ठरला...
Read More
संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती...
Read More
आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर तीन वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार दंड; राज्यभरात महिला...
Read More
रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष नवीमुंबई (मंगेश जाधव)बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा...
Read More
लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)-शिवसेना पक्षाची बांधणी युद्धपातळीवर सुरु असून याचाच...
Read More
BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार  रत्नागिरी - जि .प आदर्श...
Read More
 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड प्रतिनिधी :- निलेश रहाटे    कल्याण डोंबिवली...