जानवळे मोहल्ला येथे इफ्तार पार्टी उत्साहात; सर्वधर्मीय एकोप्याचा संदेश
तळवली (मंगेश जाधव) – गुहागर तालुक्यातील जानवळे मोहल्ला येथे रमजान महिन्यानिमित्त आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडली. या कार्यक्रमास नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच आणि जानवळे गावच्या उपसरपंच यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रमोद गांधी यांनी सांगितले की, समाजात सर्वधर्मीय ऐक्य आणि बंधुभाव टिकवण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज आहे. इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांमुळे विविध धर्मीय बांधव एकत्र येऊन परस्पर सन्मान आणि सलोखा अधिक दृढ करतात. त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, सरपंच सौ. जान्हवी विखारे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येत रमजानच्या पवित्र महिन्यात शांतता, सौहार्द आणि बंधुभावाचा संदेश दिला.
जानवळे मोहल्ल्यातील या इफ्तार समारंभामुळे गावात सामाजिक एकात्मतेचे सुंदर उदाहरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.














