राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार हे सोमवारी चिपळूण – संगमेश्वर मतदार संघाचा दौऱ्यावर…...
चिपळूण – (वार्ताहर ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार हे सोमवारी चिपळूण – संगमेश्वर मतदार संघाचा दौरा करत आहेत.
सोमवार दी. 23 रोजी ठीक सकाळी 11 वाजता. येथील सावरकर मैदानात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. खा. शरद पवार यांची सभा आयोजित आहें. ते मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.यावेळी चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार मा. प्रशांत यादव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहें. राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) चे पक्ष निरीक्षक बनन कनावजे यांनी सदर च्या नियोजित दौऱ्याची माहिती प्रसार माध्यमाना आज दिली.
चिपळूण – संगमेश्वर मतदार संघातून राष्ट्रवादी (अजित पवार गट ) चे मा. शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत परंतु तें दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांचे गटात सामील झाल्याने आता या मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवार म्हणून मा. प्रशांत यादव यांना देण्यात येणार असे खात्री लायक समजते.
येणाऱ्या विधान सभेला महाविकास आघाडी कडून चिपळूण चीं जागा ही राष्ट्रवादी लढवणार हे जवळपास निश्चित आहें. म्हणूनच सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अडी अडचणी मतदार संघातील विकासकामे आणि इतर पक्षीय पातळीवरील विषय याविषयीं तें कारकर्ते आणि पदाधिकारी यांचेशी संवाद साधतील.
सभेला राष्ट्रवादी ( शरद पवार ) चे पदाधिकारी व महाविकास आघाडीतील प्रमुख नेते ही उपस्थित राहून साहेबां चे मार्गदर्शन ऐकतील.
सदर चा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशांत यादव आणि पदाधिकारी कारकर्त्यांना नियोजन च मार्गदर्शन करीत आहेत.
♥ हे हीं वाचा ????