डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

मुंबई : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलिसीस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी मोठा विस्तार करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील केंद्राचाही समावेश आहे.

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेमुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून रुग्णांना त्यांच्या घराच्या जवळच निःशुल्क उपचार देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश असून, सध्या राज्यात ९२ महाडायलिसीस केंद्रे ५५८ बेड्ससह कार्यरत आहेत.

१ मे रोजी होणाऱ्या या विस्तारामुळे राज्यातील एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार असून, नव्या केंद्रांमध्ये दापोली (जि. रत्नागिरी) सोबतच मुरगुड, मूल, दारव्हा, केज, इगतपुरी, रावेर, मंगळवेढा, ढेबेवाडी, वेंगुर्ला, कुरखेडा आणि बदलापूर येथील रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

ही संपूर्ण योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, रुग्णांना ‘महाडायलिसीस’ संकेतस्थळ किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे उपचारासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.
या केंद्रांमध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका व सहाय्यक कर्मचारी नेफ्रोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून स्वच्छता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जाते. विशेष म्हणजे रुग्णांना रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन्स आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला या सर्व सेवा पूर्णतः मोफत दिल्या जातात.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमार्फत ही योजना राबवली जात असून, यामुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज,...
Read More
केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान   गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी...
Read More
गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

"डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या....दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला........तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात....." नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण मुंबई : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय...
Read More
डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून विधानपरिषदेच्या...
Read More
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

शीर्षक: विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद टोकाला; विरार पश्चिमेतील पूनम आकांक्षा...
Read More
विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई भूसंपादनातील अनियमितता, सरकारी तिजोरीचे नुकसान आणि कर्तव्यात...
Read More
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू खेड : वार्ताहर (योगेश पेढांबकर) तालुक्यातील धामणंद गाव येथील वावे...
Read More
१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित नवीमुंबई (मंगेश जाधव) 'दिशा महाराष्ट्राची' या...
Read More
सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात   डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल...
Read More
डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात