गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा २०२६ चा राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर मुख्याध्यापक व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त श्री सुधाकर शामराव कांबळे सर यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक या विविध कार्याच्या सन्मानार्थ देण्यात आला.शाल, श्रीफळ, मानाचा फेटा ,सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ ,सन्मानपत्र ,पुस्तक रुपी भेटवस्तू , असे पुरस्काराचे स्वरूप होते .त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे सल्लागार श्री संदीप भोसले ,संस्थापक संचालक मनोज पाटील, संस्थेचे जिल्हा साधन व्यक्ती व समन्वयक श्री गणेश कुलकर्णी सर ,सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, सांस्कृतिक कलाकार संदीप घाडे ,अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग, प्रतिष्ठित नागरिक महेश पोवळे ,मुद्रा पोवळे, राजू बावधनकर आदी मान्यवर उपस्थित होते .श्री सुधाकर शामराव कांबळे यांनी गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळ माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथे तीस वर्ष इमाने इतवारे प्रामाणिकपणे सेवा बजावलेली आहे.त्यांच्या कारकिर्दीत शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचा अंतरंग व बहिरंग विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे .त्यांनी विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वी केलेले आहेत.शाळेच्या भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी त्यांनी प्रयत्न केले.त्यांचे अनेक विद्यार्थी आता विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अत्यंत तळमळीने सर्व शिक्षक वृंदांना सोबत घेऊन संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून कार्य केले आहे.त्यांच्या विविध अंगी कार्याच्या गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.गुहागर तालुका होमगार्ड समादेशक म्हणून त्यांनी अत्यंत निष्ठापूर्वक सेवा भावी प्रमाणे सेवा बजावली आहे .त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर, ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर यासह तालुक्यातील विविध सामाजिक शैक्षणिक क्रीडा संस्थेची निकटचा संबंध आहे. त्यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक मनोज पाटील म्हणाले की श्री कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात एक आगळे वेगळे स्थान प्राप्त केले आहे .श्री कांबळे सर यांच्यासारखे अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व विद्यालयाला लाभले म्हणूनच या विद्यालयाचा गतीने विकास होत आहे .सत्काराला उत्तर देताना देताना श्री सुधाकर कांबळे म्हणाले की मी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचा अत्यंत ऋणी आहे माझ्या सेवाकाळात मला अनेकांनी सहकार्य केले, त्या सर्वांचा मी आभारी आहे.यापुढेही मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहीन .त्यांना सन्मानाचा राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान चे पदाधिकारी, अमोलजी वराडकर, गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी तसेच गुहागर तालुक्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज,...
Read More
केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान   गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी...
Read More
गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

"डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या....दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला........तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात....." नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण मुंबई : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय...
Read More
डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून विधानपरिषदेच्या...
Read More
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

शीर्षक: विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद टोकाला; विरार पश्चिमेतील पूनम आकांक्षा...
Read More
विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई भूसंपादनातील अनियमितता, सरकारी तिजोरीचे नुकसान आणि कर्तव्यात...
Read More
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू खेड : वार्ताहर (योगेश पेढांबकर) तालुक्यातील धामणंद गाव येथील वावे...
Read More
१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित नवीमुंबई (मंगेश जाधव) 'दिशा महाराष्ट्राची' या...
Read More
सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात   डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल...
Read More
डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात