आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण
स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश..!
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र हा रस्ता जीवघेणा झाला होता. सदर रस्त्याचे खड्डे बुजवणाचे वर्क ऑर्डर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ ला झाले होते. परंतु ठेकेदार हे काम अर्धवट सोडून गेले होते .सदर ठेकेदारा कडून आखाती देशात युद्ध चालू असल्यामुळे डांबराचे रेट वाढले आहेत असे सांगण्यात येत होते. या विषयाचा गुहागर तालुक्यातील कुटगीरी येथील स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे पत्र देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. प्रतिष्ठानचे पत्र आमदारांच्या हातात देताच आमदार भास्करशेठ जाधव यांनी सदर अधिकारी आणि ठेकेदार यांना फोन केला आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी तंबी दिली. सदर रस्त्याचे काम हे चार दिवसात पूर्ण करण्यात आले आहे . त्यामुळे स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. प्रदीप तुकाराम खेतले , कुणाल खाकम तसेच यासाठी मोलाचं सहकार्य करणारे प्रतिष्ठानचे सदस्य श्री. दिलीप तुकाराम खेतले यांनी आमदार श्री. भास्करशेठ जाधव साहेब यांचे आभार मानले आहेत.
















