आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

नवीमुंबई (मंगेश जाधव)
रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घाटात एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गातील आंबेनळी घाटाच्या परिसरात ही दुर्घटना घडली. स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरु झाले. बचाव पथकांना आतापर्यंत दोन मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात जवळपास 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली आहे. ही स्कॉर्पिओ गाडी साताऱ्यातील असल्याचे समजते. यामध्ये सातारा, आसगाव आणि कोरेगाव येथील पर्यटक असल्याची माहिती आहे. अद्याप अपघाताचे कारण आणि मृतांची ओळख पटलेली नाही. बचाव पथकाकडून स्कॉर्पिओ गाडीतील इतर प्रवाशांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात अनेकदा अपघात घडतात. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, खोल दरी आणि कठीण भूप्रदेशामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित सहा जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. रात्रीच्या अंधारात मृतदेह शोधण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र, आता दिवस उजाडल्याने बचावकार्याला वेग येण्याची शक्यता आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस...
Read More
कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली...
Read More
इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून...
Read More
गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश! 🌍 परदेश दौऱ्यावरून परतताच पीएम मोदी ॲक्शन...
Read More
देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर व पार्किन्सन’स डिसीज अँड मूव्हमेंट...
Read More
पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी परदेशात जाणाऱ्या सीफेरर्स, विद्यार्थी व कामगारांना होणार मोठा दिलासा पनवेल...
Read More
नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                   दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                           ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                    दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 
shivam