पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर व पार्किन्सन’स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी (पीडीएमडीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी पु. ल. देशपांडे अकॅडमी मध्ये “पार्किन्सन वर बोलू काही” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात पार्किन्सन आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पीडीएमडीएसच्या डॉ. अंजुम तडवी यांनी अत्यंत सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपयुक्त माहिती देऊन उपस्थितांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे श्रोत्यांमध्ये आजाराची लक्षणे, काळजी व व्यवस्थापन याविषयी स्पष्टता निर्माण झाली.

मुंबई प्रादेशिक विभागातील जवळजवळ शंभर ज्येष्ठ नागरिकांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमासोबतच काष्ठशिल्पकार शंकरबाबा पापळकर यांच्या काष्ठशिल्पांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास फेस्कोम कोकण विभागाचे माजी अध्यक्ष मा. शरद डिचोलकर, आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभागाच्या प्रमुख दिपिका शेरखाने आणि मनिषा खिल्लारे उपस्थित होत्या. तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र संचालक मा. मीनल जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कला अकादमीच्या प्रमुख वर्षा कराळे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

या चर्चासत्रातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यात यश आले. उपयुक्त माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सामाजिक सहभाग यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर व पार्किन्सन’स डिसीज अँड मूव्हमेंट...
Read More
पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी परदेशात जाणाऱ्या सीफेरर्स, विद्यार्थी व कामगारांना होणार मोठा दिलासा पनवेल...
Read More
नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                   दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                           ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                    दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दिली नवी...
Read More
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर…  संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न...उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप...हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली... कारवाई तात्पुरती स्थगित... लवकरच निर्णायक...
Read More
म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार   ऐतिहासिक युद्धनौकेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना; स्कुबा डायव्हिंगसह सागरी...
Read More
सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

  फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर  ...
Read More
फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे  21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात आणणारे प्रकल्प सहन करणार नाही; अमोल बोळे...
Read More
बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती रत्नागिरी -(वार्ताहर)...
Read More
योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*  कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती
shivam