श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप

गुहागर : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यालय परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. नैसर्गिक सजावटीसह उभारण्यात आलेली आकर्षक कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

या कार्यक्रमाला गुहागर केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील, गुहागर विद्यालयाच्या ९१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच लाभलेल्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे, पर्यवेक्षिका सौ. गायत्री कनगुटकर, गंगावणे सर, पालक सौ. नाटेकर मॅडम, श्री. साळवी, श्री. मोहिते सर, तांबट मॅडम, गमरे सर, पावसकर मॅडम, साबळे सर, विद्यालयातील विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

विद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँड पथकाच्या तालावर वाजत-गाजत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. गायत्री कनगुटकर व तांबट मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गमरे सर यांनी केले. उपस्थित मान्यवर व पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

शाळा प्रवेशोत्सवाचे नाविन्यपूर्ण आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी विद्यालयाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

SEO Keywords:

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर, शाळा प्रवेशोत्सव, गुहागर बातम्या, Ratnagiri News, नवीन शैक्षणिक वर्ष, विद्यार्थी स्वागत कार्यक्रम, गुहागर शिक्षण बातमी

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव