गाव विकास समिती कडून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी सौ .अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गाव विकास समिती कडून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी सौ .अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर

सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी देत गाव विकास समिती कडून सामान्य जनतेच्या हिताच्या राजकारणाला सुरुवात.

देवरुख:- (वार्ताहर) गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटने कडून अखेर चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी सौ.अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी यावेळी चिपळूण संगमेश्वर मध्ये महिला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. ऍड.सुनील खंडागळे हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरतील असेही संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या वतीने चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या आधीच झालेला आहे. संघटनेच्या कोअर कमिटीने इच्छुक उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची नावे,एडवोकेट सुनील खंडागळे व सौ.अनघा राजेश कांगणे यांची नावे अंतिम निर्णयासाठी संघटना नेतृत्वाकडे पाठवली होती.या दोन्ही नावांचा विचार संघटनेने केला. यापैकी सौ.अनघा कांगणे यांची उमेदवारी संघटने कडून निश्चित करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिक,महिलांना न्याय देण्यासाठी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचं दुःख/समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक सक्षम महिला उमेदवार या विधानसभा निवडणुकीत द्यावा असा निर्णय गाव विकास समिती संघटनेचा अध्यक्ष म्हणून उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे आम्ही दोघांनी गाव विकास समितीच्या कोअर कमिटीशी चर्चा करून घेतला असल्याचे उदय गोताड यांनी याबाबत बोलताना सांगितले.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने सौ.अनघा राजेश कांगणे यांना गाव विकास समितीची उमेदवारी आम्ही जाहीर करत आहोत, संघटनेचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट सुनील खंडागळे हे या निवडणुकीत डमी उमेदवार म्हणून अर्ज भरतील, असा निर्णय संघटनेचा झाला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटली आहे. मतदार संघातील मुद्द्यांना केंद्रस्थानी मानून ही निवडणूक लढण्याचा निर्णय गाव विकास समितीने घेतला असल्याचेही उदय गोताड यांनी म्हटले आहे.

*कोण आहेत सौ.अनघा कांगणे*

◆ गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या महिला उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.

◆ शिक्षण – M.A बीएड,

◆सात वर्ष खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम.

◆बारा वर्षाहून अधिक काळ देवरुख,संगमेश्वर भागात सामाजिक कार्यात सक्रिय.

◆कबड्डी व क्रीडा क्षेत्रात योगदान.

” चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात गाव विकास समितीमार्फत आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील महिला उमेदवार सौ.अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.एक सक्षम महिला म्हणून त्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, महिला यांच्या प्रश्नांना न्याय देतील ही खात्री आम्हाला आहे. ही निवडणूक आम्ही गाव विकास समिती म्हणूनच लढणार आहोत

–  असे उदय गोताड,अध्यक्ष गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा यानी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे महिती दिली.

Plz join watsup group ????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी