श्री.योगेश पेढांबकर यांनी दिला प्रशासनाला तीव्र आंदोलनचा इशारा.
पेढांबे –भराडेवाडी येथे वारंवार अपघात होत असल्याने तातडीने गतिरोधक व गतिरोधकसह फलक बसविण्यात यावा
चिपळूण (वार्ताहर):-..
तालुक्यातील पेढांबे-भराडेवाडी नं -१ या ठिकाणी वारंवार अपघातची मालिकाच सुरू आहे. सदर ठिकाण हे नागरिकांचे नेहमीचे वर्दळीचे आहे. भराडे नं -१ स्टॉप जवळच काही अंतरावर जि.प प्राथमिक,भराडे नं -१ शाळा आहे. शाळकरी मुले नेहमी या रस्त्याने ये-जा करीत असतात. यंदाच्या मे-जून मध्ये वारंवार ६-७ वेळा अपघात याठिकाणी अपघात झालेला आहे. यामध्ये मृत्यूही ओढवलेला आहे.यामुळे शाळकरी मुले व वाडीतील नागरिकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आजही एस. टी. रस्ता सोडून भराडे येथील निवृत्त शासकीय अधिकारी श्री.जी.बी. पेढांबकर यांच्या कंपौंउंड ला धडक दिली.व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
*सदर अपघाताची मालिका ही वारंवार सुरूच आहे या अपघातातून पेढांबे-भराडे येथील एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का ?असा सवाल माहिती अधिकार जागृत निस्वार्थी चळवळीचे जिल्हाप्रमुख यांनी प्रशासनाला जाब विचारलेला आहे. तातडीने या गोष्टीचे दखल घेतली नाही. व गतिरोधक बसवला गेला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे.*
चिपळूण-कराड हायवे असल्याने या ठिकाणी येणारी वाहने ही वेगात असतात.त्यामुळे वेगावर नियंत्रण आणण्यासाठी व गंभीर अपघात टाळण्यासाठी तातडीने गतिरोधक व गतिरोधक सहफलक बसविण्यात यावेत.व होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत उपाययोजना करण्यात यावी.अशा आशयाचे नुकतेच पत्र *मा.जिल्हाधिकारी ,रत्नागिरी मा.कार्यकारी अभियंता,चिपळूण बांधकाम विभाग,चिपळूण* यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
*माहिती अधिकार जागृत सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर* यांनी याबाबत वारंवार रस्त्याकडील वाढलेली झाडे ,तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अतिशय गंभीर अपघात होत आहे.या महिन्यामध्ये ४-५ अपघात घडलेले आहेत. यासाठी आवाज उठविण्यासाठी आता पेढांबे गावचे व माहिती अधिकार कायद्याचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री.योगेश पेढांबकर यांनी *मा.जिल्हाधिकारी व मां.कार्यकारी अभियंता,चिपळूण,रत्नागिरी* यांना निवेदन देत गतिरोधक व गतिरोधक फलक लावण्यासाठी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी व अपघात टाळणेकरिता खालील निकषानुसार गतिरोधक बसविण्यात यावेत.अशी मागणी माहिती अधिकार जागृत कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर यांनी केली आहे.
*कॅपशन तक्ता* –
*पेढांबे – भराडे वारंवार त्याच ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच प्रशासन याकडे लक्ष देणार का* ? जर या ठिकाणी एखादा मृत्यू घडला तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला जाईल.असा इशारा देण्यात आला आहे.असे माहिती अधिकार जागृत सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे
यासाठी भरधाव वेगाने येणारे वाहने यांच्यावर योग्य पद्धतीने नियंत्रण येण्यासाठी तातडीने गतिरोधक व गतिरोधकसहित फलक बसविण्यात यावा.अशी मागणी केली आहे.