गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न..!

( आर्या जाधव , मानसी पालकर व दिक्षा शितप स्पर्धेत प्रथम )

आबलोली (संदेश कदम)…..

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन गटात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. प्राथमिक गटात आर्या मनोज जाधव , माध्यमिक गटात मानसी संदीप पालकर व उच्च माध्यमिक गटात दिक्षा शितप या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक संपादन केला आहे.गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धा कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून गुहागर मुख्याध्यापक संघाचे सचिव व पालपेणे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.व्ही.हासबे , पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , कोतळूक हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी बनसोडे , काजूर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.ए.घाग , गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष एस.बी.चांदिवडे , पाटपन्हाळे हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका एस.एस.चव्हाण , प्रा. श्रीम.एम.एस.जाधव आदी. मान्यवर उपस्थित होते. पाटपन्हाळे विद्यालयातर्फे मान्यवर , शिक्षकवृंद व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील यांच्या हस्ते श्रीसरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले.

 

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न….. छाया – संदेश कडम

इयत्ता पाचवी ते सातवीच्या प्राथमिक गटात प्रथम क्रमांक – आर्या मनोज जाधव – बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल , द्वितीय क्रमांक – अक्षरा संदेश सावंत – चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली , तृतीय क्रमांक – श्रेया अनिल धुमक – न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या माध्यमिक गटात प्रथम क्रमांक – मानसी संदीप पालकर – न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे , द्वितीय क्रमांक – सिद्धी विनोद देवळे – माध्यमिक विद्यालय अडूर व तृतीय क्रमांक – ओमसाई रुपेश विचारे – बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल यांनी सुयश संपादित केले. इयत्ता अकरावी व बारावीच्या माध्यमिक गटात प्रथम क्रमांक – दिक्षा सुभाष शितप – चंद्रकांत बाईत कनिष्ठ महाविद्यालय आबलोली , द्वितीय क्रमांक रूतिका राजेश म्हसकर – न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे तसेच तृतीय क्रमांक – प्रगती पद्मनाभ जोशी – श्रीम.आर.पी.पी कनिष्ठ महाविद्यालय पालशेत यांनी यश संपादित केले. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिन्ही गटात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्राथमिक गटासाठी पी.बी. जाधव -गुहागर हायस्कूल , डी.जे.पंडित – पालशेत विद्यालय , माध्यमिक गटासाठी एस.बी.चांदिवडे – पाचेरीआगर हायस्कूल , जाधव एम.एस. – बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल व उच्च माध्यमिक गटासाठी प्रा.श्रीम.एम.एस. जाधव – कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे , पी.व्ही.साळुंके – तळवली हायस्कूल यांनी निबंध स्पर्धेसाठी परीक्षण केले. सदरच्या स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक चषक , प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले .तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे सहभाग प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमानिमित्त गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव पी.व्ही.हासबे , सचिव सुधाकर चव्हाण , मुख्याध्यापक व्ही.डी पाटील व परीक्षक श्री.साळुंके , श्री.जाधव , श्री.चांदिवडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. सदरच्या स्वागत समारंभाचे व बक्षीस वितरण गौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटपन्हाळे विद्यालयाचे शिक्षक एस.एम.आंबेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी मान्यवर , सहभागी शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ यांचे सहकार्य लाभल्याबद्दल एस.बी.भिडे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

Leave a Comment

आणखी वाचा...