
पाटपन्हाळे विद्यालयात स्वच्छता अभियानांतर्गत कार्यक्रम संपन्न..!
पं.स.गुहागर , ग्रा.पं.पाटपन्हाळे व पाटपन्हाळे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सेवा उपक्रम..!
आबलोली (संदेश कदम)…
पंचायत समिती गुहागर , ग्रामपंचायत पाटपन्हाळे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्वच्छता ही सेवा ” या उपक्रमांतर्गत जनजागृती प्रभात फेरी , स्वच्छता दौड व पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य तसेच वृक्ष वाटप यांसारखे उपक्रम नुकतेच सादर करण्यात आले.
स्वच्छता उपक्रमासाठी उपस्थित असलेले अधिकारीवर्ग मान्यवर व कर्मचारी यांचे पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पाटपन्हाळे विद्यालय , पंचायत समिती गुहागर , ग्रामपंचायत पाटपन्हाळेतर्फे शृंगारतळी बाजारपेठेत विद्यार्थी , अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता संदेशांच्या घोषणांनी जनजागृती फेरी सादर केली. पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर भारत देशाचा नकाशा रेखाटून त्या नकाशावर विद्यार्थी उभे राहून स्वच्छता दौड सादर करण्यात आले .तसेच पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थी , उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी दौड स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेसाठी ग्रामपंचायत पाटपन्हाळेतर्फे रोख रक्कम व सुपारीचे झाड बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले. विद्यार्थी दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रणय दिनेश मुकनाक – बारावी कला , द्वितीय क्रमांक – राज संदीप काजारे – अकरावी वाणिज्य , तृतीय क्रमांक – वेदांत किशोर अडूरकर – अकरावी वाणिज्य तसेच विद्यार्थिनी दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक – पूनम संजय मोहिते – वाणिज्य शाखा , द्वितीय क्रमांक धनश्री परशुराम शिगवण – अकरावी विज्ञान व तृतीय क्रमांक – भाविक सचिन रावणंग – बारावी वाणिज्य यांनी संपादित केले . तसेच अधिकारी , कर्मचारी व शिक्षक दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक – महेंद्र भुवड , द्वितीय क्रमांक – सुधीर वासनिक व तृतीय क्रमांक – सुमंत भिडे यांनी पटकावला. स्वच्छता उपक्रमांतर्गत राबवलेल्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती गुहागरचे विस्तारअधिकारी श्री.भांड , गटशिक्षणाधिकारी श्री.गळवे , पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच असीम साल्हे , ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. सुलभा बडद तसेच मान्यवर म्हणून श्याम साळवी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , ग्रामसेवक व तलाठी तसेच पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे कर्मचारी , पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ” स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता ” उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धेसाठी “झाडे लावा , झाडे जगवा ” तसेच “स्वच्छता राखा , स्वच्छता पाळा , आरोग्य जपा ” या संदेशात्मक उपक्रमासाठी अधिकारीवर्ग , मान्यवर , विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी धन्यवाद मानून उपक्रमाचा समारोप केला.

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक