स्थितप्रज्ञ दादासाहेब खरे यांच्या ७९ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना जीवनापयोगी साहित्याचे वाटप.
तळवली-( वार्ताहर);
आंतराष्ट्रीय भिमाई स्मारकाचे प्रणेते व दि. बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष दादासाहेब खरे यांच्या ७९ व्या जयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे नुकतेच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना जिवनपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्षमाच्या अध्यक्षस्थानी प्रियाताई खरे या उपस्थिती होत्या. सदर वेळी अभिमन्यु भालेराव यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, गेली तीन दशके दादासाहेबांच्या अथक प्रयत्नातून आंबेटेंबे ता. मुरबाड येथे आंतरराष्ट्रीय ‘भीमाई स्मारक’ उभे राहत आहे. आर्थिक, शारिरिक, योग्य वेळी लढा व आक्रमक होऊन आज साडेबारा एकरमध्ये आंतराष्ट्रीय भिमाई स्मारक साकारत आहे. याचे सर्व श्रेय दादासाहेब खरे यांना जाते. तसेच प्रमोद जाधव यांनी दादासाहेब खरे यांच्या तीन दशकांच्या कार्याचा आढावा घेतला . शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रियाताई खरे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रमुख मान्यवरांचे स्वागत विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक लहांगे सर यांनी केले. या विशेष प्रसंगी राजेश खरे, डॉ. वृषाली खरे तसेच विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील स्थानिक मंडळी उपस्थित होती.
आमच्या whatsup group ला join व्हा ????????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv















