गुहागरचा महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा- निलेश सुर्वे भाजपा. तालुकाध्यक्ष गुहागर
तळवली (वार्ताहर)-
264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा. गुहागर विधानसभा मतदारसंघात पूर्ण गुहागर तालुका, चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र आणि खेड तालुक्यातील 90 मतदान केंद्र असे मिळून विधानसभा क्षेत्र तयार होते.या मतदार क्षेत्रातीलच महायुतीचा उमेदवार असावा असे स्पष्ट प्रतिपादन श्री निलेश सुर्वे तालुका अध्यक्ष गुहागर भाजपा, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी गुहागर येथे केले आहे .2009 पर्यंत या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारी व्यक्तिमत्व ही या गुहागर विधानसभा क्षेत्रातीलच होती. 2009 साला नंतर बदललेल्या रचनेनुसार या विधानसभा क्षेत्राबाहेरील काही नेतृत्वानी इथे नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला तर काही नेतृत्व आपले मतदानाचे केंद्र हे गुहागर विधानसभा क्षेत्रात ठेवून निवास मात्र शहरी भागात ठेऊन आहेत. मागील 15 वर्षात विजयी आणि पराभूत उमेदवारांचे अनुभव लक्षात घेता गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व हे या विधानसभा क्षेत्रातच अधिवास असणारे असावे म्हणजे या विधानसभा क्षेत्रातील 322 मतदान केंद्र,त्यामधील महसूल गावे, त्या अंतर्गत येणाऱ्या वाडी वस्त्या यांचा विकास, त्यांच्या मुलभूत गरजा, तेथील समस्या,उद्योग व्यवसाय याची स्थानिक माणसाला चांगली जाण असते आणि यामुळेच होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून जे कोणी प्रतिनिधित्व या मतदारसंघात करणार असतील ते व्यक्तिमत्व या विधानसभा क्षेत्रातीलच रहिवासी असले पाहिजेत असे स्पष्ट मत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी व्यक्त केले आहे.
आमच्या whatsup ग्रुप ला जॉईन व्हा 👇🔗
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Author: Mangesh Jadhav
मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.