जनतेने कौल दिल्यास पुढील राजकीय निर्णय काय घ्यायचे ते ठरवणार- माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जनतेला बदल हवा आहे. कोणीतरी सिंघम किंवा बाजीगर हवा आहे. त्यामुळे मी आज मतदारांनाच साथ घालत आहे.मतदार जो निर्णय देतील त्यानुसार मी माझी पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे बाळ माने पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
आज बाळ माने पत्रकार परिषदेत काही तरी जोरदार बोलणार किंवा काही तरी गौप्यस्फोट करणार असे वाटत होते त्यामुळे सर्व पत्रकार अगदी वेळेवर उपस्थित राहीले. परंतु बाळ माने मात्र सर्वांचीच निराशा केली
खरोखर बाळ माने पुढील काही दिवसात काही मोठा निर्णय घेणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज संध्याकाळी रत्ना गिरी ची ग्रामदेवता श्री भैरी बुवा च घेणार आशीर्वाद.















